
रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करत आहेत. तसेच चित्रपटात मुख्य भुमिका साकरलेल्या हिरोवर चाहते भर-भरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा चित्रपट प्रामुख्याने पाकिस्तानमधील एका गँगवॉरची काहनी दाखवण्यात आली आहे. म्हणूनच त्याच्या बहुतेक सीनमध्ये पाकिस्तान पहायला मिळत आहे.
या चित्रपटात प्रामुख्याने पाकिस्तानमधील कराची आणि लियारी दाखवण्यात आले आहे, परंतु हा चित्रपट प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये शुट अकरण्यात आला आहे की इतर कोणत्या वेगळ्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की रणवीरच्या धुरंधरसाठी पाकिस्तानमधील ठिकाणं म्हणून भारतात कुठे शुट करण्यात आले आहे.
शूटिंग बँकॉकमध्ये झाले
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की धुरंधर चित्रपटात दाखवलेले पाकिस्तान हे दाखवण्यासाठी निर्मात्यांनी भारत किंवा पाकिस्तान न निवडता थेट थायलंडमधील बँकॉकची निवड केली. चित्रपटात पाकिस्तानचे शहरी भाग आणि गुप्तचर तळ दाखवण्यासाठी हे शहर निवडण्यात आले होते. निर्मात्यांना प्रेक्षकांना या चित्रपटात VFX-वरून तयार शहरं दाखवण्याऐवजी एक खरं गजबजलेले शहर दाखवण्यासाठी बँकॉकमध्ये काही सीन शुट केले.
पंजाबमध्ये दिसली पाकिस्तानची झलक
चित्रपटात दाखवलेला पाकिस्तान शक्य तितका खरा दिसावा यासाठी, निर्मात्यांनी पंजाब हे ठिकाणं निवडलं. खरं तर पाकिस्तानच्या ग्रामीण भागाचे शुटींग करण्यासाठी पंजाबमधील लुधियाना हे गाव निवडले गेले. चित्रपटाच्या काही भागांच्या चित्रीकरणासाठी कराची आणि ल्यारीशी ही पाकिस्तानी ठिकाणं दाखवण्यासाठी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील खेडा गाव निवडले.
मुंबईत एक शूटिंग सेटही बांधण्यात आला होता
या दोन ठिकाणांव्यतिरिक्त चित्रपटाचे काही भाग मुंबईतही शुट करण्यात आले. मुंबईजवळील नव्याने बांधलेल्या डोंबिवली-मानकोली पुलावर चित्रपटाचा काही भाग शुट करण्यात आला. मुंबईच्या फिल्म सिटीच्या जंगलात एक दमदार फाईट सीक्वेंस देखील चित्रित करण्यात आले .
याशिवाय चित्रपटातील काही इनडोअर सीन्स, गाणी आणि क्लोज-अप शॉट्स मुंबईच्या ऐतिहासिक फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आले. मड आयलंडवर आणि विलेपार्ले येथील गोल्डन टोबॅको फॅक्टरीमध्ये एक डांस देखील शुट करण्यात आले.
Leave a Reply