• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेतान्याहू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन, नेमकी काय झाली चर्चा?

December 12, 2025 by admin Leave a Comment


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा झाली.तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील झिरो टॅलरेंन्स पॉलिसीचा पुनरुच्चार केला. कोणत्याही स्वरुपाचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. नेतान्याहू आणि मोदी यांनी पश्चिम आशियामध्ये असलेल्या सध्या स्थितीवर चर्चा केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारत हा नेहमी या प्रदेशात न्याय्य आणि शांतीच्या प्रयत्नाचं समर्थन करतो. गाझा शांतता योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं. तसेच दोन्ही नेत्यांनी कायम एकमेकांच्या संपर्कात राहू असं देखील म्हटलं आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेला हा कॉल अनेकदृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होऊ शकतात, सोबतच दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य आणि संवाद आणखी वाढण्याचे संकेत यातून मिळत आहेत. भारत आणि इस्राायल केवळ सुरक्षा क्षेत्रामध्येच नाही तर परराष्ट्र धोरण आणि प्रादेशिक शांततेवरही एकत्र काम करत आहेत, मोदी आणि नेतान्याहू यांचा हा संवाद पहिल्यांदाच घडत आहे असं नाही. तर यापूर्वी देखील अनेकदा दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे.

नेतान्याहू 2017 मध्ये भारतात आले होते, त्यावेळी भारत आणि इस्रायलमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले होते, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सातत्यानं प्रादेशिक शांतता, परराष्ट्र धोरण, आणि सुरक्षे सारख्या महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं संवाद सुरूच आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आले होते, आता त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे, दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी बोलताना दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन केला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत मोठी अपडेट समोर, एकाच दिवशी…
  • फ्लॅटचे फोटो पाठवले, डिपॉझिट भरण्यास सांगितलं, तिने एक क्लिक केलं अन्… तरुण महिलेसोबत काय घडले?
  • India vs Bangladesh : आता बांग्लादेशात घुसून स्ट्राइक करण्याची वेळ आली, कारण ते कामच तसं करतायत
  • Latur Crime : चिकन, दारू आणि.. कारमध्ये जळालेल्या गोविंदला गणेशने कसं फसवलं? थंड डोक्याने काढला काटा !
  • Shilpa Shetty and Raj Kundra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ, … म्हणून अधिक कसून होणार चौकशी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in