• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना सिंदूर, ना मंगळसूत्र.. लग्नानंतर समंथा-राजला असं पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

December 16, 2025 by admin Leave a Comment


अभिनेता नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 1 डिसेंबर 2025 रोजी पहाटे कोइंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केलं. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. आता लग्नाच्या 13 दिवसांनंतर समंथा आणि राज पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. परंतु यावेळी दोघांचा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी नेटकऱ्यांना समंथाच्या भांगेत सिंदूर किंवा गळ्यात मंगळसूत्रदेखील दिसलं नाही. नवविवाहित जोडप्याला अगदीच ‘कॅज्युअल’ अंदाजात पाहून काहींनी राजच्या पूर्व पत्नीच्या पोस्टच्या ओळी टोमणे म्हणून मारल्या आहेत.

समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर राजची पूर्व पत्नी श्यामली डे हिनं कोणाचंही नाव न घेता एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने ‘उतावीळ लोकां’बद्दल एक मेसेज लिहिला होता. ‘उतावीळ लोकंच उतावळेपणाने गोष्टी करतात’, अशा आशयाची पोस्ट श्यामलीने शेअर केली होती. या पोस्टमध्ये श्यामलीने कोणाचाच उल्लेख केला नसला तरी ज्या वेळी तिने ही पोस्ट शेअर केली आहे, त्यावरून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता समंथा आणि राजला अशा अंदाजात एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच पोस्टच्या ओळी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केल्या आहेत. एअरपोर्टवर समंथा आणि राज कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसले. यावेळी दोघांनी एकमेकांचा हातदेखील धरला नव्हता. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा स्पष्ट जाणवत असल्याचंही काहींनी म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘सिटाडेट: हनी बनी’ या वेब सीरिजसाठी एकत्र काम केलं होतं. राजने याआधी सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी लग्न केलं होतं. श्यामलीने राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केलंय. तर समंथाने याआधी नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. समंथा घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. आता समंथासुद्धा तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: भविष्य मालिकांमधली ती भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावरील पक्षांच्या थव्याने खळबळ
  • IPL 2026 Auction : 369 खेळाडूंची जबाबदारी, कोण आहेत ऑक्शनर मल्लिका सागर?
  • Video: अनुष्काच्या डोळ्यात पाणी, विराटने जोडले हात… प्रेमानंद महाराजांच्या मठात नेमकं काय घडलं?
  • हे प्रचंड संतापजनक… या मुख्यमंत्र्यांनी मंचावर ओढला महिलेचा बुरखा… Video समोर येताच संतापाची लाट
  • Ambani Family : एकेकाळी झाडू – फरशी पुसणारा ‘तो’ अंबानी कुटुंबियांमुळे झालाय मालामाल, पण कसं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in