
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या चित्रपटांप्रमाणे, वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेषत: तिच्या सासरच्या मंडळींबाबत. तसेच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याने बऱ्याचदा अनेक विषयांवर तिचे स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे ती अनेकदा चर्चेतही राहिली आहे. दरम्यान अशाच एका विषयाबद्दल तिने केलेले विधान व्हायरल होत आहे. धर्म आणि जातीबद्दलच्या तिच्या अलिकडच्या विधानांचे तिचे सर्वत्र कौतुक झाले. आता तिने जो मुद्दा मांडला आहे तो रस्त्यावर होणाऱ्या छळाबद्दल. तिने आता या छळाविरुद्ध आवाज उठवला आहे आणि महिलांना सल्ला दिला आहे. तिचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्त्रीवर होणाऱ्या छळाबद्दल ऐश्वर्या काय म्हणाली?
ऐश्वर्या रायचे हे विधान एका जाहिरातीसाठी आले आहे. तिने लॉरियल पॅरिसच्या एका कार्यक्रमात रस्त्यावर होणाऱ्या छळाबद्दल भाष्य केले. ती अनेक वर्षांपासून या ब्रँडशी संबंधित आहे. इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती स्त्रीवर होणाऱ्या छळाबद्दल उघडपणे चर्चा करताना दिसत आहे.
तुमच्या ड्रेसला किंवा तुमच्या लिपस्टिकला दोष देऊ नका
व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदा विचारते की महिलांनी रस्त्यावरील छळवणूक कशी हाताळवी? ऐश्वर्या म्हणते की, ” त्या व्यक्तीला पाहून नजर चोरू नका. त्याऐवजी, समोरासमोर उभे राहा. आत्मविश्वासाने उभे राहा. कधीही तुमच्या प्रतिष्ठेशी तडजोड करू नका. स्वतःवर शंका घेऊ नका. तुमच्या ड्रेसला किंवा तुमच्या लिपस्टिकला दोष देऊ नका. रस्त्यावरील छळवणूक ही तुमची चूक नाही.”
View this post on Instagram
चाहत्यांनी केलं ऐश्वर्याचे कौतुक
ऐश्वर्या रायच्या विधानावर युजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. युर्जसने तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. त्यांनी हे देखील मान्य केले की रस्त्यावर होणारा छळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याबद्दल जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये महिलांनाच दोषी ठरवले जाते. चाहत्यांनी ऐश्वर्याच्या व्हिडिओवर उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या आणि तिचे कौतुक केले, काहींनी तर अभिनेत्रीला एक सुंदरतेसोबतच बुद्धिमान व्यक्तीही तिला म्हटले.
Leave a Reply