
पती-पत्नीच्या नात्यातील नाराजी, दुरावा दूर करण्यासाठी नव्या वर्षातील पहिला दिवस खूपच खास समजला जातो. या दिवशी सोबत पूजा करणे, मंत्राचा जप करणे, चंदनाचा टिळा लावणे तसेच सकारात्मक विचार केल्याने तुमचे नाते भविष्यात मधूर होण्याची शक्यता व्यक्त केले जाते. हे छोटे-छोटे उपया वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद पेरू शकतात. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एकत्र बसून देवाची पूजा करावी. त्यासाठी घरातील मंदिरापुढे किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन सोबत बसून एकत्र ध्यान करावे. यामुले मन:शांती मिळते आणि दोघांमधील दुरावा कमी होतो. सोबत पूजा केल्यामुळे आपुलकी वाढते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)
तुमचा जोडीदार खूपच रागीट असेल, छोट्या-छोट्या कारणांमुळे तुमच्या जोडीदाराला राग येत असेल तर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाची पूजा करून माथ्यावर चंदनाचा टिळा लावा. यामुळे मनाला शांती मिळते. तसेच रागही हळूहळू कमी होतो. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्यास घरातील वातावरणदेखील सकारात्मक राहते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पती-पत्नीने एकमेकांना गोड जेवण खाऊ घालावे. यामुळे नात्यात गोडवा निर्माण होण्यास मदत होते. तसेच पती-पत्नी एकमेकांना गोडीने बोलायला सुरुवात होऊ शकते. नाते नव्याने फुलू शकते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)




Leave a Reply