• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवविवाहित दाम्पत्याला घेऊन कुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला, देवीच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला, एका क्षणात…

December 1, 2025 by admin Leave a Comment


राज्यातील अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका हृदयद्रावक घटनेची भर पडली आहे. बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभळबेट घारी शिवार पुलावर आज, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी भीषण अपघात झाला. यावेळी मालट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी होते. ते तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. या दुर्घटनेत नवविवाहित दाम्पत्य मात्र सुदैवाने बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघात कसा झाला?

कुर्डुवाडी येथील कांबळे आणि वाघमारे कुटुंबातील सदस्य एकाच कारमधून सात प्रवासी तुळजापूरच्या दर्शनासाठी निघाले होते. नवविवाहित अनिकेत गौतम कांबळे (वय २५) आणि त्यांची पत्नी मेघना अनिकेत कांबळे (वय २२) हे त्यांच्या कुटुंबासह प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील जांभळबेट पुलाजवळ त्यांच्या कारला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याच्या खाली कोसळली आणि पुलाच्या संरक्षक कठड्याअभावी ती पूर्णपणे चिरडली गेली. या अपघातात कारमधील गौतम भगवान कांबळे (६५), जया गौतम कांबळे (६०), संजय तुकाराम वाघमारे (५०), सारिका संजय वाघमारे (४५) आणि इतर एक महिला (नववधूची मावशी) अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

दोन जण बचावले

या दुर्घटनेत अनिकेत आणि मेघना कांबळे हे नवविवाहित दाम्पत्य गंभीर जखमी झाले असले तरी ते बचावले आहेत. या अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. या दोन्ही जखमींना तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुर्डुवाडी गावावर शोककळा

पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच, अपघातास कारणीभूत असलेल्या मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने कुर्डुवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सध्या शोकाकुल कुटुंबाला धीर देण्यासाठी नागरिक घटनास्थळी आणि रुग्णालयात गर्दी करत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केसांना तेल लावण्याची योग्य वेळ काय? या प्रकारे मसाज केल्यास होईल योग्य वाढ
  • जिओचा सर्वात स्वस्त नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या किंमत
  • तिला वाटलं नवरा लाजाळू आहे… पण बॅगेत कंडोम आणि 500 हून अधिक तरुणींसोबत… अभिनेत्रींचाही समावेश; सर्वच हादरले
  • संध्याकाळी कचरा दाराबाहेर टाकताय? जाणून घ्या काय होऊ शकतात दुष्परिणाम
  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांनी बोलवली बैठक; लवकरच…मोठी अपडेट समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in