
Railway Rules : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा उत्सव असतो. आपल्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण कोट्यवधी रुपये खर्च करतात. लग्न सोहळ्यादरम्यान संगीत नाईट, हळदी समारंभ असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु याच विवाह सोहळ्यादरम्यान कधीकधी मोठं विघ्न उभं राहतं. असंच काहीसं विघ्न एका विवाहादरम्यान उभं ठाकलं आहे. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना नवरीचा अपघात झाला आहे. दरम्यान, नवरी रुग्णालयात असूनही लग्न पुढे न ढकलता अपघात झालेल्या मुलीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी रुग्णालयातच विवाह लावण्यात आला आहे. ही घटना आता देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना…
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना केरळ या राज्यातील आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार हा विवाह सोहळा कोच्ची येथील लेकशायर नावाच्या रुग्णालयात पार पाडला. येथे अलप्पुझामधील कोम्माडी येथील रहिवासी असलेल्या अवनीचे थुंबोलीमधील शेरॉन नावाच्या मुलाशी लग्न होणार होते. शुक्रवारी नियोजित वेळेनुसार लग्न पार पडणार होते. त्यासाठी तयारी शेवटच्या टप्प्यात होती. लग्नाला अवघे काही तास शिल्लक राहिले होते. नवरी आपला मेकअप करण्यासाठी गाडीवर जात होती. पण त्याच वेळी तिचा अपघात झाला. अपघातानंतर तिला लगेच कोट्टायन येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिच्या मणक्याला इजा पोहोचली आहे. त्यामुळेच तिला एर्नाकुलम येथील लेकशायर रुग्णालयात भरती करण्यात आले.
ही माहिती मिळताच नवरी आणि नवरदेवाचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. लग्नाचा मुहूर्तु दुपारी सव्वा बारा ते साडे बारा वाजताचा होता. हा मुहूर्त न टाळता वधू आणि वराच्या कुटुंबीयांनी सहसमंतीने हा विवाह रुग्णालयातच करण्याचे ठरवले. पुढे या विवाहासाठी डॉक्टरांकडून रितसर परवानगी घेण्यात आली. परवानगी मिळाल्यानंतर रुग्णालयात साधी सजावट करण्यात आली आणि लग्नसोहळा पार पडला. दरम्यान, या आगळ्यावेगळ्या लग्नाची आता चर्चा होत आहे. नवरी रुग्णशय्येवर पडलेली असूनही नवऱ्या मुलाने तिला पत्नी म्हणून स्वीकारल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.
Leave a Reply