• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली, त्यानंतर नवरी मुलीच्या कृत्याने आई-वडिलांना मान खाली घालावी लागली, लग्नात एकच खळबळ

December 1, 2025 by admin Leave a Comment


अजयपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं. गावात वरात आलेली. वरात आल्यानंतर वधू पक्षाने विधिवत वऱ्हाडी मंडळींच स्वागत केलं. वरमाळेचा कार्यक्रम झाला. यात नवरी मुलीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला. सर्व कार्यक्रम हसून, खेळून आनंदात पार पडला. पण त्यानंतर सात फेरे घेण्याआधी जे घडलं, ते सर्वांसाठी धक्कादायक होतं. वरात नवरी मुलीशिवाय परत गेली. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. नवरी मुलगी सात फेरे घेण्याआधीच तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. यूपीच्या उन्नावमध्ये ही घटना घडली. 29 नोव्हेंबरच हे प्रकरण आहे.

वरमाळेचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरी तिच्या खोलीत गेली. त्यानंतर तिला मंडपात यायचं होतं. 7 फेरे घेण्यासाठी नवरीचा शोध घेतला. त्यावेळी ती तिच्या खोलीत नव्हती. नातेवाईकांनी सगळ्या घरात शोधलं. पण नवरीचा शोध लागला नाही. नवरी गायब झाल्याच समजल्यानंतर वधू आणि वर पक्ष दोघांना धक्का बसला.

आनंद दु:खामध्ये बदलला

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, मुलीचे गावात राहणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. ते म्हणाले की, माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं. कार्यक्रमानुसार वरात ठरलेल्या वेळी आली. वरमाळेचा कार्यक्रम संपन्न झाला. पण मुलगी त्यानंतर तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. आनंद दु:खामध्ये बदलला.

युवतीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण

बँड बाजाचा निनाद थांबून आनंद दु:खामध्ये बदलला. बरीच शोधाशोध केल्यानंतर नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं समजलं. दोन्ही बाजूंसाठी हा धक्का होता. वर पक्ष वधूशिवाय परतला. नवरीच्या वडिलांनी प्रियकराविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. हास्य, विनोदाचं वातावरण शोक सागरात बुडालं. पोलीस स्टेशनचे प्रमुख अमरनाथ यादव यांच्यानुसार युवतीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण आहेत. प्रकरणाचा तपास सुरु आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ambadas Danve : बाण-पंजा एक साथ…शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, ‘द मुरुड फाईल्स’ म्हणत दानवे यांचं शिंदे सेनेवर टीकास्त्र
  • Akshaye Khanna and Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिच्यासाठी अक्षय खन्नाची बोल्ड कमेंट… तुम्ही पागल लोकांसारखं तिला फक्त…
  • Dhurandhar Aditya Dhar : 280 कोटींच्या ‘धुरंधर’ चा दिग्दर्शक आदित्य धर किती श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून..
  • Ambernath Firing : निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार… भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार अन्…
  • Imtiaz Jaleel : कव्वालीच्या कार्यक्रमात MIM नेते इम्तियाज जलील यांच्यावर उधळल्या नोटा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in