
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या मल्टिस्टारर चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हिरो असो किंवा विलेन.. प्रत्येक कलाकाराने यात दमदार कामगिरी केली आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांच्यासोबतच आणखी एका कलाकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
या अभिनेत्याचं नाव आहे दानिश पंडोर. दानिशने 'धुरंधर'मध्ये उजेर बलोचची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील दानिशच्या परफॉर्मन्सचं प्रेक्षक-समिक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. अशातच सोमवारी 22 डिसेंबर रोजी त्याने आपला वाढदिवस साजरा केला.
दानिशला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, परंतु एका अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणती नसून अहाना कुमार आहे. दानिशसोबतचे फोटो शेअर करत तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे.
अहानाने दानिशला मिठी मारतानाचे हे फोटो आहेत. 'माझ्या ओळखीतल्या सर्वांत चांगल्या आणि प्रामाणिक मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशी मी देवाकडे प्रार्थना करते', अशी पोस्ट तिने लिहिली आहे.
'तुझ्यावर नेहमी देवाची कृपा राहो आणि तुला भरपूर प्रेम, यश, आनंद मिळो. मी कायम तुझ्यासाठी चांगल्याच गोष्टी मागेन. डॅनी बॉय.. हे वर्ष तुझ्यासाठी धु-रं-धर ठरो', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. अहाना कुमराने अनुपम खेर, रणबीर कपूरसह अनेक कलाकारांसोबत काम केलंय.





Leave a Reply