
तीळ – तिळाला थंडीत सूपरफूड मानले जाते, तिळात सहा पट जास्त कॅल्शियम आढळते. १०० ग्रॅम तिळात सुमारे ९७५ ग्रॅम कॅल्शियम आढळते. तुम्ही तिळाचे लाडू, चटणी, सलाडमध्ये मिक्स करुन खाऊ शकता. थंडीत नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तिळ दिसायला जरी छोटे असले तरी यांना कॅल्शियमचा सुपरफूड म्हटले जाते.
हिरव्या पालेभाज्या – थंडीत मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमने पूरेपूर असतात. पालक, मेथी आणि बुटुव्याच्या भाजीत कॅल्शियम आणि व्हीटामिन्स K असते. जे हाडांना मजबूत करते आणि याच्या नियमित सेवनाने सांधेदुखी देखील कमी होते.
राजमा आणि चणे – अनेक लोकांना माहिती नाही राजमा आणि चण्यात देखील कॅल्शियम अधिक असते. १ कप उकडलेल्या चण्यात ८० ते १०० ग्रॅम कॅल्शियम मिळते. तसेच हे प्रोटीन, फायबर आणि आयर्न देखील देते. सर्दीत चणे – राजमा गरमागरम डीश हाडांसाठी वरदानाहून कमी नाहीत.
अंजीर – सुख्या अंजीरात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हाडे मजबूत रहातात. रोज ४ ते ५ सुखे अंजीर खाल्ल्याने शरीराची कॅल्शियमची गरज सहज पूर्ण होते.अंजीर बद्धकोष्ठतेची समस्याही कमी करते. आणि रक्त वाढवण्यास मदत करते. याशिवाय याच्या नियमित सेवनाने आरोग्याला लाभ होतो.
सोया आणि सोया प्रोडक्ट्स – पनीर आणि दूधाशिवाय देखील शरीराला कॅल्शियम मिळू शकते. केवळ तुमच्या डाएटमध्ये सोयाबिन, टोफू आणि सोया मिल्कचा समावेश करा. सोयाबिन देखील कॅल्शियममध्ये खूप असते. १०० ग्रॅम टोफूत सुमारे ३५० ग्रॅम कॅल्शियम असते. हे खास करुन त्या लोकांसाठी चांगले असते जे दूध पिऊ इच्छीत नाहीत वा लॅक्टोज इंटॉलरेंट आहेत.
बदाम -ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि अक्रोडच्या शिवाय बदाम देखील लोकांना आवडतात. परंतू अनेकांना माहिती नाही की बदामाने शरीरातील कॅल्शियमची करतरता पूर्ण केली जाते. बदाम मेंदूसह हाडांसाठी देखील चांगला आहे.१०० ग्रॅम बदामात २६० mg कॅल्शियम आढळते. थंडीत रोज ५ ते ७ बदाम भिजवून खाल्ल्याने खूप फायदा होतो.
नाचणी – रागी किंवा नाचणीत जास्त कॅल्शियम आढळते. १०० ग्रॅम रागीत तीन ग्लास दूधाची ताकद असते. कारण केवळ १०० ग्रॅम रागीत ( नाचणी ) शरीराला ३५० ग्रॅम कॅल्शियम मिळते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी नाचणी खूपच फायदेशीर असते. नाचणीला भाकरी, डोसा, खीर वा दलिया रुपात खाता येते.






Leave a Reply