
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध सुरूवातीचे दोन्ही टी20 सामने जिंकून मालिका 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना जिंकून पाच सामन्याची मालिका खिशात घालण्याचा मानस असेल. तिसरा सामना तिरूवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. (Photo- BCCI Women Twitter)
तिसऱ्या टी20 सामन्यात दीप्ती शर्माकडे मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. सध्याचा तिचा फॉर्म पाहता तिसर्या टी20 सामन्यात सहज शक्य असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात दीप्ती खेळली नव्हती. पण तिसऱ्या सामन्यात खेळली तर नक्कीच विक्रमाला गवसणी घालेल. (Photo- BCCI Women Twitter)
दीप्ती शर्माने आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 148 विकेट घेतल्या आहेत. दोन विकेट घेताच पुरूष आणि महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट घेणारी पहिली भारतीय ठरेल. आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इथपर्यंत मजल मारता आलेली नाही. (Photo- BCCI Women Twitter)
टी20 महिला आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुट्टच्या नावार आहे. तिने एकूण 151 विकेट घेतल्या आहे. तिसऱ्या सामन्यात चार विकेट घेतल्या तर तिलाही दीप्ती शर्मा मागे टाकेल. (Photo- BCCI Women Twitter)
दीप्ती शर्माने आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 130 सामने खेळले आहेत. यात तिने 18.99 च्या सरासरीने 148 विकेट्स घेतल्या आहेत. दीप्तीच्या इकॉनॉमी रेटबद्दल सांगायचं तर तो 6.11 इतका आहे. (Photo- BCCI Women Twitter)




Leave a Reply