• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! ‘बिग बॉस मराठी 6’च्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

December 26, 2025 by admin Leave a Comment


“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार” या दमदार थीमसोबत रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. कार्यक्रमाच्या सहाव्या सिझनची हवा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असताना थीमविषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा बहुप्रतिक्षित प्रोमो समोर आला आहे. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचं नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ‘फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत” अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी या सिझनचा बार उडवला आहे. नक्की दारापलीकडे काय ट्विस्ट असणार, सदस्यांना हे सगळं कसं नव्या पेचात टाकणार, कोण होणार पास तर कोण होणार फेल, या सगळ्याची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन येत्या 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार या ओटीटीवर पहायला मिळणार.

प्रोमो रिलीज होताच त्याचं प्रमुख आकर्षण ठरतंय रितेश भाऊचे कोड्यातून गेम आणि घराची थीम सांगणारे प्रभावी संवाद. प्रत्येक प्रोमोमध्ये रितेश प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो. कधी सरप्राइझ, नवा लूक, वेगळी स्टाइल, खास स्वॅग हे त्याच्या प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही तसंच काहीसं घडलं आहे. या प्रोमोमध्ये यंदाच्या सिझनची थीम वेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांसमोर आणण्याकरीता रितेश एका हटके लूकमध्ये दिसत आहे. या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार” अशी आहे. या सिझनचा खेळ महाराष्ट्राला खिळवून ठेवणार हे नक्की. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” भाऊच्या ओळी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणार यात वाद नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट, दारापल्याडचं सरप्राइज ठरवेल प्रत्येकाची वाट; यामुळे प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो, असा ठाम इशारा हा प्रोमो देतो. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड आतुरतेने या नव्या सिझनची वाट पाहतोय. घर नक्की कसं दिसणार, नक्की काय सरप्राइझेस असणार आणि क्षणात डाव कसा बदलणार, हे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आलिया-अनन्यामुळे श्रद्धा कपूरला मिळत नाहीये काम? वडिलांनी दिलं उत्तर
  • घरातील देव्हाऱ्या संबंधित ‘हे’ नियम ठेवा लक्षात, अन्यथा गरिबी सोडणार नाही तुमची साथ
  • Prashant Jagtap : आता मरेपर्यंत काँग्रेसमध्ये… राष्ट्रवादीच्या आघाडीला विरोध करत प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, ‘पंजा’ हाती घेतला
  • चीनची अमेरिकेवर मोठी कारवाई, तैवानला शस्रास्रे विकण्याचा प्रयत्नाचा असा घेतला बदला
  • दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! ‘बिग बॉस मराठी 6’च्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in