
संजय शिरसाट यांनी महायुती आणि नवाब मलिक यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. भाजपने ज्या पक्षाचे नेतृत्व नवाब मलिक करतील, त्यांच्यासोबत युती न करण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारत असताना नवाब मलिक यांच्यासारख्यांना सोबत घेणे महायुतीला परवडणारे नाही, असे शिरसाट यांनी सांगितले. मलिक यांना पूर्वीही सत्तेत घेतले नव्हते आणि आताही त्यांच्या भूमिकेला विरोध असल्याचे ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईचा विकास या तीन प्रमुख मुद्द्यांवर लढणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लवकरच जागा वाटपाबाबत अंतिम बोलणी करतील, अशी माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून केली जाणारी मागणी शिरसाट यांनी लाचारीची असल्याचे म्हटले. तसेच, प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत, त्यांना त्यांच्याच पक्षातून त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
Leave a Reply