
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. तर दुसरं लग्न हेमा मालिनी यांच्यासोबत झालं… पहिल्या पत्नीपासून चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला आणि दोन मुलींना जन्म दिला. (Esha Deol on father second marriage) पण हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, हे ईशा आणि अहाना देओल यांना माहिती नव्हतं. ईशा हिला हे सत्य जेव्हा कळलं तेव्हा ईशा फक्त चौथीत शिकत होती…
हेमा मालिनी यांच्या ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या बायोग्राफीमध्ये, ईशा देओलनं सांगितलं होतं की, तिला वडील धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाची माहिती कशी मिळाली. ‘शाळेतली मुलं मला विचारायची, “तुला दोन आई आहेत का?” मला राग आला. मी म्हणालो, “काय मूर्खपणा! माझी फक्त एकच आई आहे.” पण घरी येताच मी माझ्या आईला माझ्या मित्रांनी विचारलेला प्रश्न सांगितला. तेव्हा माझ्या आईला वाटलं की, हिच खरी वेळ आहे सत्य मुलींना सांगण्याची…’
पुढे ईशा म्हणाली, ‘विचार करा, मी चौथीमध्ये शिकत होती आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नव्हतं… आताची मुलं तर किती स्मार्ट आहे… त्यावेळी मला कळलं की, माझ्या आईने अशा पुरुषासोबत लग्न केलं आहे, ज्याचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्यांना मुलं देखील होती… पण मला या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही…’
‘आजपर्यंत मला असं कधीच वाटलं नाही की, त्यांनी काही चुकीचं केलं आहे … त्यांनी आम्हाला कधीच असहज वाटू दिलं नाही आणि याचं श्रेय मी पूर्णपणे माझ्या आई – वडिलांना देईल… लहान असताना मी माझ्या मित्रांच्या घरी जायची तेव्हा त्यांच्या आई – वडिलांना सोबत पाहायची… तेव्हा कळलं की वडीलसोबत असतात तेव्हा सर्व गोष्टी किती सोप्या असतात… पण आम्ही कधीच या वातावरणात वाढलो नाही आणि या गोष्टींचा आता कोणता फरक देखील पडत नाही…’ असं देखील ईशा म्हणाली होती.
Leave a Reply