• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डॉक्टर हा मुलगा आहे की मुलगी? भारताच्या या शहरात पसरायल महाभयंकर आजार, रुग्णालयात येतायेत शेकडो केस

December 29, 2025 by admin Leave a Comment


एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एक दहा दिवसांचं नवजात बालक दिल्लीमधील एम्सच्या ओपीडीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या नवजात बालकाचे आई-वडील हे अत्यंत गरीब घरातील आहेत. जे नवजात बालक या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, ते डिहायड्रेटेड आणि आजारी होतं. त्याचे आई वडील त्याचा एका मुलीप्रमाणे सांभाळ करत होते. परंतु समस्या ही होती की, या बालकाच्या गुप्तांगाचा पूर्णपणे विकास झालेला नव्हता, त्यामुळे ते बालक नेमकं मुलगी आहे की मुलगा हे सांगता येत नव्हतं. तसेच जे बालक या रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं, ते बालक मुलगा आहे की मुलगी? हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी जेव्हा त्या बालकाच्या टेस्ट केल्या तेव्हा त्यांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं की, हे बालक मुलगीच आहे. मात्र पुढे चालून एक ऑपरेशन करावं लागेल, त्यानंतर सामान्य मुलींप्रमाणे या बालकाची वाढ होईल.

परंतु त्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे दहा दिवसांनंतर पुन्हा हेच बालक दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु यावेळी त्याच्यासोबत त्याचे आई वडील नव्हते तर काही तृतीयपंथी लोक त्याला घेऊन रुग्णालयात आले होते. घटनेबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा हे तृतीयपंथी लोक या मुलाला रुग्णालयात घेऊन आले तेव्हा या बालकाला प्रचंड धक्का बसलेला होता. आम्ही त्या बालकाला ओळखलं, त्याच्यावर उपचार सुरू केले, त्याच्या आई-वडीलांची समजूत देखील काढली. मात्र त्यांनी या मुलाचा सांभाळ करण्यास नकार दिला, शेवटी त्याला एका चाइल्ड केअरमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर दीड वर्षांनी एका विदेशी नागरिकाने या मुलीला दत्तक घेतलं, ती मुलगी आता सामान्य जीवन जगत आहे.

हे एकच प्रकरण नाहीये तर अशा शेकडो केस एम्समध्ये येत आहेत. अशा केसमध्ये नवजात बालक हे पूर्णपणे मुलगाही नसतो आणि मुलगी देखील नसते. अनेकदा समाजाच्या दबावामुळे आणि भीतीमुळे पालक अशा मुलांचा सांभाळ करण्यास नकार देतात. मात्र असे मुलं हे सामान्यच असतात. हा फक्त एक डिसऑर्डर ऑफ सेक्स डेव्हलपमेंट (DSD) नावाचा आजार असून, याचा शंभर टक्के इलाज उपलब्ध आहे. एका ऑपरेशन नंतर असे मुलं नॉर्मल होतात अशी माहिती एम्सच्या बालरोग तज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉ. वंदना जैन यांनी दिली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपच्या नेत्याचं भाषण सुरू होतं… अचानक हल्ला झाला, कोणीच वाचलं नसतं… मधमाशांचं टोळकं… नेमकं काय घडलं?
  • WPL 2026 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात नव्या कोचची एन्ट्री, दिग्गज खेळाडू करणार मार्गदर्शन
  • IND vs NZ : शुबमनकडे नेतृत्व;रोहित-विराटही सज्ज! न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजसाठी भारताचा संभाव्य संघ
  • प्रसाद जवादेच्या आईचं कर्करोगाने निधन; सून अमृताची पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी!
  • डॉक्टर हा मुलगा आहे की मुलगी? भारताच्या या शहरात पसरायल महाभयंकर आजार, रुग्णालयात येतायेत शेकडो केस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in