
आंध्र प्रदेशच्या अनाकापल्ली जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. विशाखापत्तनमदुव्वाडा येथून एर्नाकुलम येथे जाणाऱ्या टाटा-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (ट्रेन नंबर 18189) च्या दोन एसी कोचमध्ये भीषण आग लागली. एलामंचिली रेल्वे स्टेशन जवळ मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला तेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या पँट्री कारजवळ असलेल्या बी-1 आणि एम-2 एसी कोचमध्ये आग लागली.
अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत दोन्ही डबे पूर्णपणे आगीत जळून खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेत होरपळून अनेक जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
( डिस्क्लेमर : ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत. )
Leave a Reply