
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर यांच्यातील अफेअरच्या चर्चा समोर आल्या तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार, “तेवर” सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान हे दोन्ही स्टार जवळ आलं. पण दोघांनी कधीच सर्वांसमोर नात्याची कबुली दिली नाही.
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरला होता. पण, त्यांचं नातं फार काळ टिकले नाही. त्यांनी “आर राजकुमार” चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेह याचेही सोनाक्षी सिन्हाशी नातं जोडलं गेलं होते. रिपोर्ट्सनुसार दोघेही लग्नाच्या टप्प्यावर पोहोचले होते. पण दोघाचं नातं फार काळ टिकलं नाही.
सोनाक्षीच्या अफेअर लिस्टमध्ये फेम सिनेमाजचा मॅनेजिंग डायरेक्टर आदित्य श्रॉफ याचाही समावेश आहे. दोघांबद्दल अनेक चर्चा समोर आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आणि आदित्य श्रॉफ यांचं लवकरच ब्रेकअप झालं.
या सगळ्यानंतर, सोनाक्षीचं नाव अभिनेता झहीर इक्बालशी जोडलं गेलं. जवळपास सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.




Leave a Reply