
Director Ranjit Patil Death : 2025 अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठं संकट आलं. तर अनेक दिग्गजांनी अखेरचा श्वास घेतला. आता देखील मोठी धक्का घटना घडली आहे. दिग्दर्शक आणि मराठी अभिनेता रणजीत पाटील यांचं निधन झालं. ‘जर तर गोष्टी’ या नाटकाचं ते सध्या दिग्दर्शन करत होते. दिग्दर्शन व्यतिरिक्त त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजवलं. ‘ह्रदय प्रीत जागते’ मालिकेत देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली… त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वांनी कौतुक देखील केलं.
पण त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना आणि मराठी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी रणजीत यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रणजीत पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी हृदयाच्या निगडीत समस्या होत्या.
रणजीत पाटील यांचं निधन झाल्यामुळे मराठी कालाकारांना मोठा धक्का बसला आहे… रणजीत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांने एकांकिका स्पर्धांमधून तरूण कलाकारांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं. रणजीत पाटील यांनी रूईया महाविद्यालयातील एकांकिकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली होती. आता त्यांच्या निधनामुळे दिग्दर्शन आणि अभिनय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रणजीत यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पश्चात आई – वडील असा परिवार आहे.
रणजीत पाटील यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक एकांकीका, मालिका आणि नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांनी झगमगत्या विश्वाचं देखील मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही… अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
2025 बद्दल सांगायचं झालं तर, यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटींचं निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधला एक महिना देखील झाला नाही, रणजीत यांचं निधन झालं आहे. मनोज कुमार, गोवर्धन असरानी, सुलक्षणा पंडित, जुबीन गर्ग, सतीश शाह यांनी देखील 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. ज्यामुळे सिनेविश्वाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Leave a Reply