
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू 2025 नुसार युरोपीय देश रोमानियात प्रति व्यक्ती मद्याचा खप जास्त आहे. रोमानियाची प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 17 लिटर शुद्ध अल्कोहोलचे सेवन करतो.रोमानियाचे लोक वर्षाला 17 लिटर दारु पितात.अन्य युरोपियन देश जॉर्जिया ( 14.3 लिटर ) आणि चेक रिपब्लिक ( 13.3 लिटर ) हून जास्त आहे.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हयू आणि अन्य स्रोतानुसार दारुच्या खपात रोमानिया सातत्याने क्रमांक एकवर आहे. रोमानियात पाहुण्यांचे स्वागत दारुने होते.लग्नात, अंतिम संस्कार,सण – समारंभात दारु आर्वजून दिली जाते.लोक आनंदी आणि दु:खी अशा दोन्ही वेळा दारु पितात.
रोमानिया मध्ये घरगुती दारु पसंद केली जाते. बोरापासून किंवा द्राक्षापासून तयार केलेली पारंपारिक दारु 'तुईका' ग्रामीण भागात खूप बनवली जाते आणि प्राशन केली जाते. ही एक मजबूत स्पिरीट असते. रोमानियात मद्य बनवण्याची परंपरा 2000 वर्षे जुनी आहे.येथे अनेक सालांपासून द्राक्षाची शेती आणि वाईनची निर्मिती केली जाते.अनेक ठिकाणी पारंपारिक जुन्या पद्धतीने दारु बनवली जाते.
रोमानियात दारु खूप स्वस्त आहे. कमी टॅक्स, काही वेळा अवैध किंवा विना कर वाली दारु सहज मिळते. येथे दारु सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा खप प्रचंड आहे. भारतात प्रति व्यक्ती दारुचा खप 3.02 ते 4.98 लिटर दरम्यान आहे.हा रोमानिया आणि बहुतांश युरोपीय देशांच्या तुलनेत खूप कमी आहे.
धार्मिक – सांस्कृतिक कारणाने भारतात मोठ्या प्रमाणात दारु निषिद्ध मानली जाते. परंतू भारतातही दारु पिण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. शहरीकरण,वाढते उत्पन्न, तरुण पिढीची बदलती लाईफस्टाईल आणि शहरात सोशल ड्रिकींगचा ट्रेंडमुळे भारतातही दारुची विक्री वाढली आहे.दारु पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.अशात तिचे संतुलित सेवन आणि जागरुकता गरजेची आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील दारुचा खप जास्त असलेल्या देशांना दारु नियंत्रणाचा सल्ला दिला आहे.




Leave a Reply