• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चेन्नई सुपर किंग्सने 14.2 कोटींची लावलेली बोली योग्यच ठरली! झालं असं की…

December 24, 2025 by admin Leave a Comment


Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. खासकरून फलंदाजांनी आक्रमक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. असं असताना या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूने जबरदस्त कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्सचा बोलीला योग्य मान दिला आहे. नुकतीच आयपीएल 2026 मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू प्रशांत वीरला संघात घेण्यासाठी 14.2 कोटींची बोली लावली. काहीही करून त्याला संघात घेण्याचा चेन्नई सुपर किंग्सचा अट्टाहास अनेकांना आश्चर्याचा धक्का देणार होता. पण विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्याने प्रशांत वीर दमदार कामगिरी केली आणि बोली योग्यच असल्याचं दाखवून दिलं. आयपीएल 2026 स्पर्धेत प्रशांत वीर चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात उतरणार आहे. त्याच्यासाठी इतकी रक्कम मोजल्याने तो प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही.

प्रशांत वीरने पदार्पणाच्या सामन्यात कमाल केली

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशचा सामना हैदराबादशी झाला. या सामन्यात प्रशांत वीर उत्तर प्रदेशकडून मैदानात उतरला होता. उत्तर प्रदेशच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आली. त्याने 50 षटकात 5 गडी गमवून 324 धावा केल्या. या सामन्यात प्रशांत वीरला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण फार काही चेंडू शिल्लक नसल्याने फलंदाजी कमाल करता आली नाही. त्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारत नाबाद 7 धावा केल्या. पण धावा रोखण्यासाठी प्रशांत वीरचं योगदान महत्त्वाचं राहिलं. त्याने 10 षटकात 47 धावा दिल्या आणि तीन विकेट काढल्या.

Debut day ft. Prashant Veer ✅
3/47 vs HYD 🔥
Couldn’t have asked for more 🥳#WhistlePodu #VijayHazareTrophy pic.twitter.com/4cxIRcTaL5

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 24, 2025

प्रशांत वीरने एलगनी वरूण गौड, प्रज्ञान रेड्डी आणि नितीन साई यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादचा संघ 43 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारू शकला. उत्तर प्रदेशने हा सामना 84 धावांनी जिंकला. दरम्यान, प्रशांत वीरने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत आतापर्यंत फक्त 2 फर्स्ट क्लास आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 167.16 च्या स्ट्राईक रेटने 112 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 40 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच 12 विकेट काढल्या आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 7 हजारच्या सवलतीसह OnePlus 15R चा पहिला सेल भारतात सुरू, जाणून घ्या किंमत
  • अमेझॉनवर Samsung Galaxy Z Fold 6 च्या किंमतीत घट, जाणून घ्या ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन
  • ‘तेरे लिए मैंने पहली वाली छोड दी’ गाण्यावर अरबाजचा डान्स; मलायका अरोरा ‘शॉक्ड’!
  • 2025 : सुरक्षित भारत! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या लष्करी निर्धाराची पुनर्व्याख्या
  • काळे लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? एकदा नक्की वाचा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in