
चपातीपासून पोहे तुम्ही तयार करु शकता. त्यासाठी तुम्हाला शिळी चपाती लागणार आहे. सर्वात आधी चपातीचे बारीक तुकडे करा. कांदा, मिरची, मोहरी, कढीपत्ता परतून त्यात चपातीचे तुकडे टाका. त्यानंतर हळद, मीठ, लिंबू घालून तयार करा चपातीचे पोहे…
चपाती रोल / फ्रँकी देखील तुम्ही तयार करु शकता… चपाती आधी गरम करुन घ्या चपातीवर सॉस, मेयो किंवा चटणी लावा. त्यानंतर भाज्या, पनीर किंवा भाजलेले बटाटे भरून रोल बनवा… आता चपाती रोल खाण्यासाठी तयार…
चपाती चिप्स देखील तुम्ही खाऊ शकता… चपातीच्या पातळ पट्ट्या कापा करा… त्यानंतर ते तेलात तळा किंवा तव्यावर कुरकुरीत भाजा… भाजल्यानंतर मसाला मीठ, चाट मसाला शिंपडा ज्यामुळे चविष्ट चिप्स तयार होतील.
चपातीचे लाडू देखील तुम्ही तयार करु शकता.. चपाती मिक्सरमध्ये क्रश करा… त्यानंतर चपातीच्या क्रशमध्ये तूप, गूळ/साखर, सुका मेवा मिसळून लाडू वळवा… खाण्यासाठी हे लाडू चविष्ट लागतील…
हे थोडं वेगळं वाटेल पण तुम्हा एकदा ट्राय करुन नक्की बघा.. चपातीची लस्सी… चपातीचा भुसा, ताक आणि मीठ मिसळून घ्या. त्यानंतर चपातीची लस्सी पिण्यासाठी तयार होईल… घरात शिळी चपाती असेल तर, हे नक्की करुन बघा…




Leave a Reply