
90 च्या दशकात आपल्या दिमाखदार स्टाईलने आणि डान्सने सर्वांच्या मानवर राज्य करणारा हीरो नंबर वन म्हणजे अर्थातच गोविंदा. एकापाठोपाठ एक ब्लॉकब्लस्टर चित्रपट देणारा हा अभिनेता आजही तेवढाच लोकप्रिय आहे. गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही तेवढाच प्रसिद्ध आहे. त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल तो कायमच स्पष्टपणे बोलत आलेला आहे. गोविंदा त्याच्या आईबद्दलही नेहमी बोलताना दिसतो. त्याचे आईवर सर्वात जास्त प्रेम होते. हे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. तो आईची रोज अगदी देवीसारखी पूजा करायचा. पण हे फार कमी जणांना माहित असेल की गोविंदाची आई या मुस्लिम होत्या.
गोविंदाची आई निर्मला देवी कोण होती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची आई निर्मला देवी यांचा जन्म 7 जून 1927 रोजी वाराणसी येथील एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पहिले नाव नाझिम होते. परंतु 1941 मध्ये त्यांनी चित्रपट निर्माते अरुण कुमार ओझा यांच्याशी लग्न केले, त्यानंतर त्यांचे नाव निर्मला देवी असे बदलण्यात आले. म्हणजे लग्नानंतर त्यांचा धर्म अन् त्यांचे नाव दोन्हीही बदलले.
लग्नानंतर निर्मला देवी यांना चार मुले झाली. कामिनी, कृती कुमार, पुष्पा आनंद आणि गोविंदा. पण असे म्हटले जाते की, गोविंदाच्या जन्मानंतर निर्मला देवी यांनी संन्यास घेतला होता आणि त्या साध्वी बनल्या. निर्मला देवी यांचे 3 जुलै 1998 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
गोविंदा आणि त्याच्या आईचे खास नाते होते.
गोविंदा अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आईबद्दल भरभरून बोलला आहे. गोविंदाची पत्नी सुनीताने देखील ही गोष्ट कितीतरी वेळा सांगितली आहे की गोविंदा गोविंदा एक खूप चांगला मुलगा आहे. त्याने कायम आईचाच शब्द शेवटचा धरला आहे. त्यांच्यासाठी तो जीवही देऊ शकत होता इतकं त्याचं आईवर प्रेम आहे. असं सुनिताने सांगितलं आहे.
View this post on Instagram
आजही, जरी त्याची आई हयात नसली तरी, तो नेहमीच त्यांचा फोटो पाहूनच बाहेर पडतो. जेव्हा त्याची आई जिवंत होती, तेव्हा गोविंदा त्याच्या आईचा अंगठा धुवून पाणी पित असे. गोविंदा त्याच्या आईची देवीप्रमाणे पूजा करत असे आणि आजही आईची आठवण काढताना तो नेहमी भावनिक होतो.
गोविंदाची चित्रपट कारकीर्द
वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर गोविंदाने त्याच्या वडिलांकडे चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 1982 मध्ये गोविंदाने डिस्को डान्सर हा चित्रपट पाहिला आणि तेव्हाच त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने 1986 मध्ये ‘तन बदन’ या चित्रपटातून पदार्पण केले, परंतु त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह 86’ या चित्रपटाने त्याला ओळख मिळाली. त्यानंतर गोविंदाने ‘हत्या’, ‘स्वर्ग’, ‘आग’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर 1’, ‘आदमी खिलोना है’, ‘आंदोलन’, ‘कुली नंबर 1’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
Leave a Reply