
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अभिनेता अक्षय कुमार ओळखला जातो. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. कॉमेडी असो, अॅक्शन असो किंवा रोमांटिक, प्रत्येक जॉनरच्या चित्रपटांद्वारे त्याने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अक्षय कुमार तर आपल्याला सर्वांना माहिती आहेत, पण त्याची बहीण अलका भाटिया यांना तुम्ही ओळखता का? त्या सुद्धा चित्रपट क्षेत्रातच काम करतात. अक्षय कुमार रुपेरी पडद्यावर येऊन लोकांचे मनोरंजन करतो. तर दुसरीकडे अलका, अक्षयची बहिण चित्रपट निर्माती म्हणून काम करते.
अलका भाटिया यांचा जन्म १९७० साली झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आणि तिथून कॉलेजचे शिक्षण घेतले. अलका ही अक्षयची एकूलती एक बहिण आहे. १९९७ मध्ये त्यांनी वैभव कपूर यांच्याशी लग्न केले. १९९८ मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी सिमर ठेवले. आता सिमरही चित्रपटांमध्ये डेब्यू करत आहे.
काही वर्षांतच झाला घटस्फोट
लग्नानंतर काही वर्षांतच अलका आणि वैभव यांच्या नात्यात समस्या निर्माण झाल्या आणि नंतर दोघांचा घटस्फोट झाला. अलकाने एकटीने सिमरला लहानाचे मोठे केले. २०१२ मध्ये अलकाने बिझनेसमन सुरेंद्र हीरानंदानी यांच्याशी लग्न केले, जे हीरानंदानी ग्रुपचे एमडी आहेत. अलकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ‘फगली’, ‘हॉलिडे’, ‘एयरलिफ्ट’, ‘रुस्तम’, ‘केसरी’ आणि ‘रक्षा बंधन’ यांसारखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत.
अलकाप्रमाणेच सिमरनेही आता चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत ‘इक्कीस’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्रही झळकणार आहेत. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. ‘इक्कीस’ १ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘इक्कीस’ची रिलीज डेट पुढे ढकलली गेली
आधी हा चित्रपट २५ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर त्याच्या प्रदर्शनाची तारीख रिलीज पुढे ढकलण्यात आली आणि निर्मात्यांनी १ जानेवारीला चित्रपट सिनेमागृहात आणण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनला आहे. ही तीच कंपनी आहे ज्याने ‘स्त्री २’ आणि ‘छावा’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत.
Leave a Reply