
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची घोषणा झाली आहे. महायुतीतील पक्षांनी यात शानदार विजय मिळवला आहे. 215 नगराध्यक्ष हे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. महायुतीचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात जल्लोष करत आहेत. आता संपूर्ण राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले याची माहिती समोर आली आहे. यात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विदर्भात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले?
- एकूण जागा – 100
- भाजप – 58
- शिवसेना – 8
- राष्ट्रवादी – 7
- काँग्रेस – 23
- शिवसेना ठाकरे गट – 0
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 0
- इतर – 4
मराठवाड्यात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष?
- एकूण जागा – 52
- भाजप – 25
- शिवसेना – 8
- राष्ट्रवादी – 6
- काँग्रेस – 4
- शिवसेना ठाकरे गट – 4
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 2
- इतर – 3
उत्तर महाराष्ट्रात कुणाचे वर्चस्व?
- एकूण जागा – 49
- भाजप – 18
- शिवसेना शिंदे गट – 11
- राष्ट्रवादी – 7
- काँग्रेस – 5
- शिवसेना ठाकरे गट – 2
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 1
- इतर – 5
पश्चिम महाराष्ट्रात कुणी मारली बाजी?
- एकूण जागा – 60
- भाजप – 19
- शिवसेना – 14
- राष्ट्रवादी – 14
- काँग्रेस – 3
- शिवसेना ठाकरे गट – 1
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 3
- इतर – 6
कोकणात कुणाची सत्ता ?
- एकूण जागा – 27
- भाजप – 9
- शिवसेना – 10
- राष्ट्रवादी – 1
- काँग्रेस – 0
- शिवसेना ठाकरे गट – 2
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 1
- इतर – 4
संपूर्ण महाराष्ट्रात कुणाचे किती नगराध्यक्ष?
- भाजप – 129
- शिवसेना – 51
- राष्ट्रवादी – 35
- काँग्रेस – 35
- शिवसेना ठाकरे गट – 9
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 7
- इतर – 22
राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले?
- भाजप – 3325
- शिवसेना – 695
- राष्ट्रवादी – 311
- काँग्रेस – 131
- शिवसेना ठाकरे गट – 378
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 153
- इतर – 140
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 129 नगराध्यक्ष भाजपचे आले आहेत. युतीचे 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक 2017 मध्ये नंबर एक होतो. 1602 नगरसेवक होते. आता 3325 नगरसेवक निवडून आले आहोत. 48 टक्के भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षानेही चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स आम्ही दिला आहे.
Leave a Reply