• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

November 28, 2025 by admin Leave a Comment


राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने दिली माहिती

याबाबत माहिती देताना निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांना म्हटले की, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.

अपक्ष उमेदवारांना दिलासा

प्रचाराची वेळ वाढवण्याचे कारण म्हणजे, नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना 26 नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांना प्रचारासाठी खुप कमी म्हणजे फक्त चार दिवसांचा वेळ मिळणार होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रचाराला वेळ वाढवल्याने अपक्ष आणि स्थानिक पक्षांच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मतदान केंद्रांचा आढावा घेतला जात आहे. या निवडणुकांसाठी 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी तब्बल 13 हजार 355 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pakistan Sanskrit : पाकिस्तानात थेट संस्कृत शिकवली जाणार, नव्या निर्णयाची चर्चा!
  • ‘मी लियोनल मेस्सीची…’, चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा
  • जया बच्चन यांची वागणूक पाहून संतापली हुमा कुरेशी, पॅपराजींशी संबंधीत त्या वक्तव्याला दिले सडेतोड उत्तर
  • मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, व्हिसाबाबत घेतला खळबळजनक निर्णय, होणार मोठा परिणाम
  • अंडी, चिकन खात नाही का? प्रोटीनसाठी ‘या’ गोष्टी खा, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in