• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काका की पुतण्या? पुण्यात कुणाची हवा? अजितदादा गटाचं 17 पैकी… काय आहे निकाल?

December 21, 2025 by admin Leave a Comment


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालात महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. तब्बल 200 पेक्षा जास्त नगर पंचायची आणि नगरपरिषदांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व पहायला मिळत आहे. पुण्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष एकमेकांसमोर होते. मात्र यात अजित पवारांची सरशी पहायला मिळाली आहे. जिल्ह्यातील 17 पैकी 10 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांचे वर्चस्व पहायला मिळत आहे. जिल्हातील 17 पैकी 10 ठिकाणी राष्ट्रवादीचं वर्चस्व पहायला मिळत आहे. तसेच भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचा एक नगराध्यक्ष विजयी झाला आहे. तर भाजपचे 4 नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर शिवसेनेचे 4 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. या पक्षाचा एकही नगराध्यक्ष निवडून आलेला नाही.

राष्ट्रवादीच्या विजयी नगराध्यक्षांची यादी

  • शिरूर – ऐश्वर्या अभिजीत पाचरणे
  • लोणावळा – राजेंद्र बबन सोनवणे
  • वडगाव मावळ – अबोली मयूर ठोरे
  • भोर – रामचंद्र श्रीपती आवारे
  • बारामती – सचिन सदाशिव सातव (आघाडीवर)
  • तळेगाव दाभाडे – संतोष हरिभाऊ दाभाडे (राष्ट्रवादी भाजप युती)
  • इंदापूर – भरत सुरेश शहा
  • जेजुरी – जयदीप दिलीप बारभाई
  • दौंड – दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे
  • फुरसुंगी – संतोष फकिरा सरोदे
  • माळेगाव बुद्रुक – सुयोग शामराव सातपुते

शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेली ठिकाणे

  • मंचर
  • राजगुरुनगर
  • जुन्नर
  • चाकण

भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेली ठिकाणे

  • आळंदी
  • सासवड

बारामतीत अजित पवार गटाचा गुलाल उधळून जल्लोष

बारामती नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे, मनीषा समीर चव्हाण, जय नानासाहेब पाटील, प्रवीण दत्तू माने, रूपाली नवनाथ मलगुंडे, संपदा सुमित चौधरी व विष्णू तुळशीराम चौधरी हे विजयी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनुप्रिता तांबे बिनविरोध विजय झाल्या होत्या. या नगरसेवकांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 55 वेळा साजरी केली सुहागरात, तो असे काही करायचा की नववधू थरथर कापायची, काय घडलं?
  • सकाळी ‘हे’ सुवर्ण पाणी प्यायल्यास वजन होईल झटपट कमी
  • मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट? राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
  • निकाल जाहीर होताच भाजपात दुफळीचं वादळ, मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर माजी मंत्र्याचं मोठं विधान!
  • अचानक फाटली पाण्याची पिशवी; डिलिव्हरीच्या आधी भारती सिंहची अशी अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in