• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कांतारामधल्या ‘चावुंडी देवी’चा रणवीरकडून अपमान; तक्रार दाखल होताच उचललं हे पाऊल

December 2, 2025 by admin Leave a Comment


गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या (इफ्फी) समारोप समारंभात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने (HJS) रणवीरविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केल्याने रणवीरवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यादरम्यान आता त्याने जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझे हेतू नव्हता, असं त्याने स्पष्ट केलंय. यासंदर्भात रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

रणवीर सिंहचा माफीनामा-

‘कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली.

तुलू समुदायात चावुंडी देवीला खूप मानलं जातं. अशा देवीचं अपमानास्पद पद्धतीने चित्रण किंवा वर्णन करणं म्हणजे त्यांचा अनादर करण्यासारखंच आहे. अशा कृत्यामुळे जनतेत आक्रोश पसरू शकतो आणि शांती भंग होऊ शकते, असं हिंदू जनजागृती समितीने तक्रारीत म्हटलंय.

‘इफ्फी’च्या मंचावर रणवीर सिंहने चावुंडी देवीची नक्कल केली आणि कोटितुलू समुदायासाठी पूजनीय असलेल्या या दैवाचा उल्लेख त्याने ‘स्त्री भूत’ असा केला होता. त्याने डोळे मोठे करून आणि जीभ बाहेर काढून देवीची नक्कल केली होती. इतकंच नाही तर रणवीर म्हणाला होता, “मी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला आणि त्यात ऋषभचा परफॉर्मन्स जबरदस्त होता. खासकरून तेव्हा जेव्हा तुझ्या अंगात स्त्री-भूत येते.” यानंतर रणवीर जेव्हा मंचावरून खाली उतरतो आणि ऋषभ शेट्टीजवळ जातो, तेव्हासुद्धा तो तशीच नक्कल करत खिल्ली उडवतो. ऋषभ त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याकडे रणवीर लक्ष देत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Akshaye Khanna : इकडे ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ, रेहमान डकैत हिट ! पण तिकडे अक्षय खन्ना मात्र..
  • हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांना ‘ही’ लक्षणे जाणवतात; ती ओळखली तर अपघात टळू शकतो
  • Sanjay Raut : तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता… ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय म्हणाले संजय राऊत ?
  • कलाकेंद्रातून फोन, नृत्याची आवड पूर्ण करण्यासाठी बीडमध्ये आली अन् नंतर जे काही घडलं… माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर
  • Border 2 : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर लांब ठेवलं, पण ‘बॉर्डर 2’चा टीझर येताच सावत्र बहीण ईशा देओलने केली ही मोठी गोष्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in