
आजकाल अनेकजण गरज पडेल तेव्हा वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज घेतात. कठीण काळात तुम्हाला कर्जाने घेतलेले पैसे मदतीला येतात. पण भविष्यात या कर्जाचे ईएमआय भरणे मानसिकदृष्या तसेच आर्थिक दृष्टीकोनातून फार जिकरीचे आणि अडचणीचे होऊन बसते.
त्यामुळे घेतलेल्या कर्जाची लवकरात लवकर परतफेड करणे फार गरजेचे असते. तुम्ही मुदतीच्या आत कर्जाची परतफेड केल्यास तुमचे अतिरिक्त जाणारे व्याज वाचते. तसेच तुम्ही ईएमआयमधून लवकरात लवकर मुक्त होता. त्यामुळेच कर्जातून लवकर कसे मुक्त व्हावे हे समजून घेऊ या….
तुम्ही घेतलेल्या कर्जावर इतर बँकांच्या तुलनेत जास्त व्याजदर असेल तर तुमच्याकडे बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय असतो. हा पर्याय वापरून तुम्ही कमी व्याजदर असलेल्या बँकेत तुमचे उर्वरित कर्ज ट्रान्सफर करू शकता. असे केल्यास तुमच्या कर्जाचा कालवधी कमी होतो. तसेच तुमचे व्याजरुपी जाणारे अतिरिक्त पैसेही वाचतात. असे करताना प्रोसेसिंग फी आणि अन्य चार्जेस लागतात. हे शुल्क किती आहे, ते एकदा जाणून घ्यावे.
कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षी एखादा अतिरिक्त ईएमआय भरू शकता. तसेच बोनस आले असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने अतिरिक्त पैसे जमा झाले असतील तर ते पैसे भरून तुम्ही तुमच्या कर्जाचा कालवधी कमी करू शकता. यामुळे तुमचे व्याजरूपी जाणारे अतिरिक्त पैसे वाचतील. फक्त कर्जाची परतफेड लवकर करायची आहे म्हणून इमर्जन्सी फंडचा वापर करू नये.
(टीप- हा लेख फक्त माहिसाठी आहे. लेखाच्या माध्यमातून कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्याचा आमचा उद्देश नाही. कोणतीही गुंतवणूक करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply