• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

करीना कपूरला दुसऱ्या अभिनेत्यांसोबत पाहून… सैफ अली खानने सांगितला तो अनुभव

December 16, 2025 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील सर्वांत आवडत्या जोडप्यांपैकी एक सैफ अली खान आणि करीना कपूर खान नेहमीच एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना मागे-पुढे पाहत नाहीत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने त्याच्या आणि करीनाच्या नात्याबद्दल वक्तव्य. त्याने कबूल केले की डेटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांत करीनाला इतर स्टार्सच्या जवळ पाहिले की त्याचा खूप जळफळाट व्हायचा. पण जळफटापासून सुरू झालेले नाते प्रेमात बदलले आणि बॉलिवूडला एक पॉवरफुल जोडपे मिळाले.

‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितले, “सुरुवातीला मला हे कठीण वाटायचे. कदाचित मला थोडी जेलसी व्हायची. बेबोला इतर स्टार्ससोबत काम करताना पाहून मी कसे रिअॅक्ट करावे हे समजायचे नाही. ही अशी भावना होती जी भावनिकदृष्ट्या परिपक्वतेने हाताळावी लागते. नाते पुढे नेण्यासाठी एकमेकांवर खूप विश्वास आणि श्रद्धा आवश्यक असते.”
‘हे कसे हाताळावे?’ असा विचारल्यानंतर त्याने पुढे सांगितले, “सामान्यतः मी अशा मुलींना डेट केले होत्या ज्यांचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. मला आश्चर्य वाटायचे की माझे प्रतिस्पर्धी तिचे सहकारी असतील आणि मी विचार करायचो, ‘हे कसे हाताळावे?’ पण प्रेमाने सर्व काही जिंकले.”

करीना सर्वांत धैर्यवान आणि प्रेमळ व्यक्ती

सैफने करीनाचे कौतुक करत सांगितले की, “ती एक अविश्वसनीय महिला आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण ती मला भेटलेली सर्वांत धैर्यवान आणि प्रेमळ व्यक्ती आहे. ती पूर्णपणे अद्भुत आहे. मी सतत तिच्या बद्दल बोलू शकतो. थोडेसे मॅशी वाटते, पण ती आमच्यासाठी उत्तम घर बनवते. कॅमेऱ्यासमोर क्रिएटिव्ह आहे, पण आमच्यासोबतही तितकीच क्रिएटिव्ह असते.” सैफने सांगितले की करिना स्टार असूनही आई, पत्नी आणि गृहिणीची भूमिका अतिशय उत्तमरीत्या पार पाडते. त्यांच्या कुटुंबात महिलांकडून कोणत्याही अपेक्षा नसतात, ज्यामुळे करीनाला स्वातंत्र्य मिळते.

बेबोला दुसऱ्या स्टारसोबत पाहून सैफला यायचा राग

डेटिंगच्या दिवसांची आठवण काढत सैफने कबूल केले, “सुरुवातीला मला हे सगळे हाताळणे कठीण होते. कदाचित थोडी जेलसी आणि विश्वास नव्हता. करीनाचे इतर पुरुषांसोबत काम करण्यावर मी कसे रिअॅक्ट करावे. हे सर्व नवे होते. अशा भावनांना परिपक्वतेने प्रक्रिया करावी लागते आणि एकमेकांवर भरपूर विश्वास आणि श्रद्धा आवश्यक असते. जेव्हा नाते नवे असते आणि तुम्ही नैसर्गिकरित्या असुरक्षित असता तेव्हा नेव्हिगेट करणे कठीण होते. सामान्यतः मी अशा मुलींना डेट केले होत्या ज्यांचा चित्रपटांशी संबंध नव्हता. मला सर्वांत जास्त धक्का बसला तो हा की माझे प्रतिस्पर्धी तिचे मित्र बनत होते आणि मी विचार करायचो, ‘हे कसे हाताळावे?’ पण प्रेमाने सर्व जिंकले.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धुरंधरमधील रहमान डकैत कोणत्या धर्माला मानतो, देवाबद्दल बोलतानाचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!
  • मुंबईसाठी शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट; भाजपा काय निर्णय घेणार?
  • गरोदर महिलांना जर लोहाची कमतरता जाणवत असल्यास ‘या’ बिया ठरू शकतात खूप फायदेशीर
  • एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, शिवीगाळ… ढकलाढकली… भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या; Video व्हायरल
  • पाकिस्तानी लोक कोणत्या प्राण्याचे मांस खाणे पसंत करतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in