
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चिमुकल्याच्या हत्येने सोलापूरात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाची हत्या केली आहे. कपड्याला विष्ठा लागल्याच्या शुल्लक कारणावरून 3 वर्षाच्या चिमुकल्याला संपवले असल्याचे समोर आले आहे. सोलापूरातील एमआयडीसी परिसरातील कोंडानगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता प्रियकर मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आरोपी बिगारी कामगार
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर मौलाली आणि मृत मुलाची आई शैनाज हे गेल्या काही महिन्यापासून सोलापूरात वास्तव्यास होते. हे दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील रहिवासी आहेत. शैनाजला चार मुलं होती. हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. शैनाज ही धुणे भांडी करत होती, तर कथित प्रियकर मौलाली हा बिगारी कामगार म्हणून काम करत होता.
3 वर्षीय फरहानचा खून
मौलाली उर्फ अकबर हा 11 डिसेंबर रोजी दारू पिऊन येऊन घरी झोपला होता, त्यावेळी त्याच्या शेजारी 3 वर्षांचा फरहान झोपला होता. झोपेत फरहानची शी आरोपीला लागली आणि आरोपीने 3 वर्षीय फरहानचा खून केला. शैनाज घरी आल्यानंतर फरहान खाली पडल्याचं मौलाली उर्फ अकबर याने सांगितलं. फरहानला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळेस तेथील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
यानंतर हे दोघे कर्नाटकातील विजयपूर येथे एसटी स्टँड वर गेले, त्यावेळी मौलाली उर्फ अकबर पळून गेला. त्यानंतर शैनाज हिने पहिल्या नवऱ्यासह शासकीय रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी फरहानला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी विजयपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तो गु्न्हा आता सोलापूरात वर्ग करण्यात आला आहे.
आरोपीला अटक
मृत फरहानचा शवनिच्छेदन अहवाल विजयपूर येथील शासकीय रुग्णालयाने सादर केला आहे. यात फरहानचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता आरोपी अकबरला सोलापूर MIDC पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Leave a Reply