
14 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बॉन्डी बिचवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 16 हून अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. आता या हल्ल्यातील अतिरेकी साजिद अक्रम याचे हैदराबाद कनेक्शन समोर आले आहे. याचा खुलासा तेलंगणा पोलिसांनीचे केला आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार ज्यू नागरिकांवर अंधाधुंद फायरिंग करणारा साजिद अक्रम यांना 27 वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधार्थ ऑस्ट्रेलियाला गेला होता आणि तेथेच तो सेटल झाला होता.
स्टुडन्ट व्हीसावर ऑस्ट्रेलियात गेला
या अतिरेकी साजिद अक्रम याचे भारतीय कनेक्शन समोर आले आहे. साजिद अकरम याने हैदराबाद येथून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले आणि 1998 मध्ये स्टुडन्ट व्हीसावर तो ऑस्ट्रेलियात गेला होता. शेवटचा तो हैदराबादला साल 2022 मध्ये आला होता. साजिद याने युरोपियन मूळ असलेल्या वेनरो ग्रॉस या महिलेशी विवाह केला आणि दोघेही कायमचे ऑस्ट्रेलियाचे रहिवाशी झाले. साजिद याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. साजिद याचा मुलगा नवीद यानेही ऑस्ट्रेलियातील या हल्ल्यात सहभाग घेतला आहे. दोघाही बापलेकांनी हा नृशंस हल्ला केला आहे.
कुटुंबाने तोडले नाते
साजिद अकरम याच्याकडे सध्या भारतीय पासपोर्ट आहे. परंतू त्याची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियात जन्माला आल्याने तेथील नागरिक बनली आहे. कुटुंबांच्या सदस्यांच्या मते त्यांनी अनेक वर्षांपासून साजिद याच्या संबंध तोडले आहेत. परंतू जेव्हा त्यांना कळले की त्यांचा मुलगा आणि नातू ऑस्ट्रेलियातील अतिरेकी हल्ल्यातील संशयित आहेत हे कळल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांना कळेना की त्यांचा मुलगा कसा काय कट्टरपंथीय बनला. 14 डिसेंबर रोजी उत्सव साजरा करण्यासाठी सिडनीच्या बॉन्डी बिचवर पोहचलेल्या ज्यू लोकांवर साजिद अकरम आणि त्याच्या मुलगा नवीद अकरम यांनी फायरिंग केली. त्यामुळे 10 ते 82 वर्षांपर्यंत 16 जणांचा मृ्त्यू झाला आहे.
Leave a Reply