
पोस्ट ऑफीसच्या मासिक उत्पन्न योजनेत (MIS) तुम्हाला वारंवार पैसे टाकण्याची गरज लागत नाही. फक्त एकदाच गुंतवणूक कराताच मासिक कमाई सुरु होते. पोस्ट ऑफीसच्या या योजनेत 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत असते. जे थेट तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होते. हे पेसे तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये ठेवू शकता. आणि गरज पडल्यानंतर कधीही काढू शकता.
किती करावी लागते गुंतवणूक ?: पोस्टाच्या या मासिक उत्पन्न योजनेत (MIS) तुम्हाला केवळ 1000 रुपयांनी देखील अकाऊंट उघडता येते. सिंगल अकाऊंटमध्ये कमाल 9 लाखापर्यंत गुंतवणूकीची मर्यादा आहे. तर जॉईंट अकाऊंटमध्ये ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत आहे. जॉईंट अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त 3 लोक सामील होऊ शकतात.
9 लाखाच्या गुंतवणूकीवर किती कमाई ?: जर तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये 9 लाख रुपयांची रोकड एकदम जमा कराल तर संपूर्ण पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला तुम्हाला 5550 रुपयांचे फिक्स्ड व्याज मिळेल तसेच तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ते व्याज येते. तुमच्या मासिक उत्पन्नाचा तो मजबूत आधार होईल.
मॅच्युरिटीवर काय फायदा ?: MIS योजना 5 वर्षात मॅच्युअर होते. मॅच्युरिटीच्या वेळी तुमची जमा पूर्ण रक्कम बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली जाते. म्हणजे दर महिन्याला व्याज तर मिळेलच शिवाय तुमची मूळ गुंतवणूकही संपूर्णपणे सुरक्षित राहिल.
अकाऊंट कसे उघडायचे ? : MIS स्कीममध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफीसात सेव्हींग्स अकाऊंट उघडणे गरजेचे आहे. अकाऊंट उघडताच फिक्स्ड मासिक उत्पन्न लागलीच सुरु होते. आणि तुम्ही पैशांचा वापर तुमच्या मर्जीने करु शकता.ही योजना खास करुन त्या लोकांसाठी फायद्याची आहे, जे सुरक्षित आणि नियमित उत्पन्नाच्या शोधात आहेत.




Leave a Reply