
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या, यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, अफगान प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येचा धक्कादायक दावा केला. इमरान यांच्या कुटुंबियांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटू दिलं जात नाही अशा वातावरणात ही बातमी आली. दरम्यान, इमरान यांच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा इमरान यांची ओळख प्लेबॉय अशी होती…
इमरान खान यांचे तीन लग्न…
इमरान खान यांचे अनेक महिलांसोबत नाव जोडण्यात आलं. तर त्यांनी तीन लग्न केली. इमरान यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं पहिलं लग्न 1995 मध्ये इंग्रजी टीव्ही आणि चित्रपट निर्मात्या जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुले झाली. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघे वेगळे झाले.
2015 मध्ये, इमरान यांनी ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार रेहम खानशी लग्न केलं, जे फक्त दहा महिने टिकलं. त्यानंतर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये, इमरान यांनी बुशरा बीबीशी लग्न केलं, जी एक धार्मिक नेत्या आणि प्रख्यात राजकारणी होती.
लग्नांव्यतिरिक्त, इमरान यांचे अनेक अफेअर्स होते आणि तो त्याच्या तारुण्यात प्लेबॉय म्हणून ओळखला जात असे. अनेक महिलांसोबत इमरान यांचे खासगी संबंध होते. एवढंच नाही तर, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांना देखील इमरान यांनी डेट केलं आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
इमरान खान आणि रेखा यांचे प्रेमसंबंध
रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले होते, ‘काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं… ‘ असं देखील इमरान खान म्हणाले होते.
पण रेखा यांच्या आईने दोघांच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं.. रेखा यांच्या आईने दोघांच्या नात्याबद्दल ज्येतिषांसोबत देखील बोलणी केली होती. पण रेखा आणि इमरान यांचं लग्न होऊ शकलं नाही… इमरान यांनी रेखा यांच्यासोबत मुंबईत क्वालिटी टाइम घालवला आणि दोघेही जवळपास एक महिना एकत्र राहिले मुंबईच्या बीचवर अनेकदा दोघांना स्पॉट करण्यात आलं. पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
Leave a Reply