• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आलिया-अनन्यामुळे श्रद्धा कपूरला मिळत नाहीये काम? वडिलांनी दिलं उत्तर

December 27, 2025 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या स्टारकिड्स आणि नवीन कलाकारांना इतका भरणा झाला आहे, की काहींच्या नशिबात हवे तसे प्रोजेक्ट्स मिळत नाहीयेत. काही कलाकार मोजकेच चित्रपट करत आहेत. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्सच्या गर्दीत एक अशी स्टारकिडसुद्धा आहे, जिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. परंतु त्या मानाने तिला चित्रपटांचे ऑफर्स फारसे मिळत नाहीयेत. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूर आहे. श्रद्धाचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. श्रद्धा जाणूनबुजून निवडक चित्रपटांमध्ये काम करते, कारण ती इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त फी घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

श्रद्धा कपूरने 2010 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘आशिकी 2’, ‘एक विलेन’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इथूनच ती ‘नॅशनल क्रश’ बनली. परंतु फिल्म इंडस्ट्रीत 15 वर्षे काम करूनही श्रद्धाने आतापर्यंत जवळपास 18 चित्रपटांमध्येच काम केलंय. श्रद्धाच्या पदार्पणाच्या दोन वर्षांनंतर आलियाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तिने आतापर्यंत जवळपास 20 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्या पांडेनं आतापर्यंत 12 चित्रपटांमध्ये काम केलंय. तिचा तेरावा चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘द पॉवरफुल ह्युमन्स’ या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल शक्ती कपूर म्हणाले, “ती खूप कमी चित्रपटांमध्ये काम करते. ती सर्वांत चांगल्या चित्रपटांची निवड करते आणि इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ती अधिक मानधन घेते. आलिया भट्ट, अनन्या पांडे यांसारख्या अभिनेत्रींपेक्षा श्रद्धाची फी अधिक आहे. ती वर्षातून फक्त एक किंवा दोनच चित्रपट करणं पसंत करते.” यावेळी त्यांनी तिला काम न मिळण्याच्या अफवांना स्पष्टपणे नाकारलं. “तिला काम मिळत नाही?”, असा सवाल त्यांनी हसत केला. “ती खूप जिद्दी आहे आणि फक्त तिच्या मनाचं ऐकते. तिचे काही सिद्धांत आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे ती त्यांनाच फॉलो करते. आम्हा दोघांचंही नातं खूप चांगलं आहे. आम्ही कधी भांडतो, तर कधी एकत्र सुट्ट्यांचा प्लॅन करतो. कधी चित्रपटांवर चर्चा करतो. मला तिचा खूप अभिमान आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कैदी नंबर 343 ला घेऊन या…, तुरुंगात सलमान खानची अशी अवस्था पाहून आई – वडिलांना बसलेला मोठा धक्का
  • James Concert Attack : बांग्लादेशात भयानक परिस्थिती, प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला, जमावाने स्टेजवर दगड, विटा फेकल्या
  • कोरोनापेक्षाही मोठं संकट भारतात, डॉक्टरांची भयंकर चेतावणी, थेट फुफ्फुसांच्या…
  • 10 दिवस लवंगाचे पाणी प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या तज्ञांकडून
  • चणे आणि मनुके यांचे सेवन करताच आरोग्याला होतील ‘हे’ 10 फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in