
हिवाळ्यात गूळ खाणं हे आरोग्यासाठी एक अत्यंत फायदेशीर मानलं जातं. कारण गुळाच्या सेवनाने आपले शरीर उबदार राहण्यासाठी उत्तम मानले जाते. तसेच गुळाच्या सेवनाने पचनसंस्था मजबूत करण्यासोबतच, गूळ आपल्या शरीराला इतर अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. म्हणूनच तज्ञ आपल्याला आहारात गूळ खाण्याची शिफारस करतात. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे गूळ मिळतील. पिवळा गुळ व काळा गुळ देखील मिळतो. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण त्यांचा आहारात काळ्या गुळाचा समावेश अधिक करताना दिसत आहे. परंतु बरेच लोकं गूळ खरेदी करताना त्याच्या रंग आणि पोतकडे बारकाईने लक्ष देतात.
मात्र आजकाल बाजारात भेसळयुक्त गूळ मिळत आहे. म्हणून गुळ खरेदी करण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे खात्री करून खरेदी करणे महत्वाचे आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की काळा आणि पिवळा गुळांमध्ये वेगवेगळे पौष्टिक मूल्ये आणि फायदे आहेत. या लेखात आपण जाणून घेऊयात की या दोन गुळांपैकी कोणता गुळ आरोग्यदायी आहे आणि त्यात जास्त पोषण तत्व अधिक आहे.
गूळ हे आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ आहे
हेल्थलाइनच्या मते गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच साखरेपेक्षा जास्त फायदेशीर मानले जाते. कारण गुळामध्ये मोलासेस घटक असतो. जो आपल्या आरोग्यासाठी सुपरफुड मानला जातो.
पिवळा आणि काळ्या गुळांमध्ये काय फरक आहे?
काळ्या आणि पिवळ्या गुळातील फरकाबद्दल बोलायचे झाले तर, काळा गुळ आरोग्यदायी मानला जातो कारण त्यात कॅमिकलचा वापर केला जात नाही. सोडियम बायकार्बोनेट सारखी अनेक केमिकल पिवळा गुळ शुद्ध करण्यासाठी वापरले जातात. काळा गुळ गडद तपकिरी, चिकट आणि जड असतो. तथापि पिवळा गुळ सोनेरी, चमकदार दिसतो. चवीनुसार काळा गुळ कमी गोड असतो, तर पिवळा गुळ जास्त गोड असतो. तथापि काळा गुळ खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवू शकतो. दोन्ही गुळाचे पौष्टिक मूल्य देखील लक्षणीयरीत्या बदलते.
काळा की पिवळा गूळ खाणे कोणता जास्त फायदेशीर आहे?
काळा गुळ पोषक तत्वांनी समृद्ध असतो. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. काळा गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. दुसरीकडे पिवळा गुळ कमी फायदे देतो कारण त्यात केमिकलचा वापर अधिक असतो. ज्यामुळे ॲलर्जी किंवा पोट खराब होऊ शकते. मात्र काळा गुळ कमी प्रमाणात खा, कारण गुळ हे जड असते आणि अतिसेवनाने बद्धकोष्ठता निर्माण करू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply