• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘आता वेळ आली आहे…’ सोनू सूदची सरकारकडे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

December 12, 2025 by admin Leave a Comment


बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामाव्यतिरिक्त, त्याने त्याच्या सामाजिक कार्याद्वारे राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली आहे. दरम्यान,सोनू सूदने आता अजून एका मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच त्याबद्दल त्याने थेट सरकारकडे मागणी केली आहे. त्याने आता 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

भारतातील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी

सोनू सूदने भारतातील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अभिनेत्याने खऱ्या बालपणाची आणि मजबूत कौटुंबिक संबंधांची गरज यावर भर दिला आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोनू सूदने देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या याच निर्णायाचे उदाहरण देत भारत सरकारने देखील याचे अनुकरण करून 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाबाबत आवश्यक पावले उचलण्याचं, सोशल मीडिया बंद करण्याचे आवाहन सरकारला केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

अभिनेता सोनू सूदला देशभरातील लोकांचे समर्थन

अभिनेता सोनू सूदने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, “ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. भारतानेही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांना खरे बालपण, मजबूत कौटुंबिक संबंध आणि स्क्रीन व्यसनापासून मुक्तता मिळावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या सरकारने देशाच्या भविष्यासाठी मोठी पावले उचलली आहेत आणि हे आणखी एक उत्तम उदाहरण मांडू शकते. उद्याच्या चांगल्या भारतासाठी आजच आपल्या मुलांचे रक्षण करूया.” अभिनेता सोनू सूदच्या या पोस्टनंतर देशभरातील लोक त्याच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहेत.

Countries like Australia have already banned social media for kids under 16 — and it’s time India considers the same. Our children deserve real childhoods, stronger family bonds, and freedom from screen addiction. 🇮🇳
Our Govt has taken incredible steps for the nation’s future,…

— sonu sood (@SonuSood) December 11, 2025

“मुलांसाठी नाही” हा पर्याय निवडणे आवश्यक आहे”

आपल्या देशात 16 वर्षांखालील मुलांकडून सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करण्यासाठी कोणतेही ठोस कायदे नाहीत. सोशल मीडियावरील व्यभिचाराच्या विरोधात एक कायदा लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये कोणताही व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी “मुलांसाठी नाही” हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. ही सेटिंग काही व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचण्यापासून रोखते परंतु पूर्ण नियंत्रण प्रदान करत नाही. एकदा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला की, तो कोणत्याही वापरकर्त्याद्वारे ॲक्सेस केला जाऊ शकतो. शिवाय, या वर्षी सरकारने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू केला आहे, ज्यामध्ये 18 वर्षांखालील मुलांसाठी अकाउंटना परवानगी देण्यापूर्वी प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांना पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai : BKT कडून केईएम रुग्णालय येथे अत्याधुनिक क्रीडा दुखापत व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन
  • Lucky Dates For 2026 : पुढल्या वर्षात कोणती जन्मतारीख ठरणार भाग्यशाली ? तुमची जन्मतारीख आहे का ?
  • Manikrao Kokate : अटक वॉरंटनंतरही माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद वाचणार? सर्वात मोठी बातमी समोर
  • पाकिस्तानमध्ये जाऊन शूट झाली का रणवीर सिंहची धुरंधर? मुंबईसह ‘या’ ठिकाणी झाले कराची सारख्या दिसणाऱ्या ठिकाणंच शुटिंग
  • कोकाटे यांचे मंत्रिपद जाणारच, थेट कायद्यातील तरतूद समोर; सरोदेंनी सगळं सांगितलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in