
अमेरिकेत आपले घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. पण तिथे प्रत्यक्ष राहण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागतात. हल्ली बहुतेक भारतीय हे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.
अमेरिकेत स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी घराचे भाडे हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न असतो. जर तुम्हाला अमेरिकेत दोन बेडरूमच्या (2BHK) अपार्टमेंट भाड्याने घ्यायचे असेल तर ते शहर, राज्य आणि प्रदेशानुसार वेगवेगळे असते.
अमेरिकेत सरासरी दोन बेडरूमच्या अपार्टमेंटचे एक महिन्याचे भाडे १,७०० ते १,९०० युएस डॉलर इतके आहे. भारतीय चलनानुसार हे भाडे साधारण १.४ लाख ते १.६ लाख इतके आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी हे भाडे जास्त असते. तर लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांमध्ये २ बीएचके अपार्टमेंट खूपच स्वस्त उपलब्ध होतात.
अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी दरमहा US २,३०० डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २ लाख १० हजार भाडे द्यावे लागते.
अमेरिकेतील अपार्टमेंट भाड्याने घेताना सुरुवातीला मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे पहिल्या महिन्याचा एकूण खर्च भाड्यापेक्षा खूप जास्त असू शकतो. भाड्यासोबत तुम्हाला डिपॉझिटहे भरावे लागते.
त्यासोबतच पहिल्या महिन्याचे भाडे आगाऊ देणे बंधनकारक असते. काही शहरांमध्ये, एजंट किंवा ब्रोकरमार्फत अपार्टमेंट घेतल्यास हे शुल्क देखील लागू होते. अमेरिकेतील अपार्टमेंट्सची रचना आणि सोयी सुविधा भारतातल्या अपार्टमेंटपेक्षा थोड्या वेगळ्या असतात.
तसेच या ठिकाणी ओपन किचनची संकल्पना अधिक लोकप्रिय आहे. या ठिकाणी बहुतांश अपार्टमेंटमध्ये डिशवॉशर, मायक्रोवेव्ह, मिक्सर, रेफ्रिजरेटर, ओव्हन, वॉशिंग मशीन आणि ड्रायर यांसारखी आवश्यक उपकरणे असतात. तसेच डायनिंग टेबल, ड्रॉइंग रूमचे फर्निचर बनवलेले असते.
याव्यतिरिक्त, अनेक अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये जिम, स्विमिंग पूल आणि कम्युनिटी हॉलसारख्या अतिरिक्त सुविधाही उपलब्ध असतात. त्यामुळे अमेरिकेत अपार्टमेंट भाड्याने घेताना केवळ भाडेच नव्हे, तर या सर्व सुविधाही दिल्या जातात.







Leave a Reply