• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमर होण्याच्या वेडाने अब्जाधिशांना पछाडले! मृत्यूवर मात देण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा, त्या प्रयोगांना यश येणार?

December 28, 2025 by admin Leave a Comment


Defeat to Death: जगभरातील श्रीमंतांना सध्या अमर व्हायचे आहे. त्यासाठी हे उद्योगपती कोट्यवधींचा चुराडा करत आहेत. दीर्घायुषी होण्यासाठी जगभरात प्रयोग सुरू आहेत. आरोग्य क्षेत्रातील या चमत्कारीक प्रयोगासाठी अनेक वैज्ञानिक, संशोधक दिवसरात्र झटत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान एक गुप्त वार्तासमोर आली होती. त्यात हे दोन्ही नेते अमरत्वाबाबत चर्चा करताना दिसले. चीनच्या बीजिंगमधील एका कार्यक्रमात माईक सुरू होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची चर्चा समोर आली. या चर्चेत हे दोन्ही नेते अवयव प्रत्यारोपणाच्या तंत्राविषयी आणि आयुष्य वाढवण्याविषयी चर्चा करत असल्याचे समोर आले. मनुष्य आता 150 वर्षे जीवंत राहू शकतो या वैज्ञानिकांच्या दाव्याविषयी दोघांची चर्चा सुरू होती. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. काय आहे ती अपडेट?

जगातील बडे नेतेच नाही तर उद्योगपती, श्रीमंतांना सुद्धा अमरत्वाची भूरळ पडली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील बडे उद्योगपती, श्रीमंत त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. त्यांना मृत्यूवर मात करायची आहे. त्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. वृद्धत्व येऊच नाही आणि आलेच तर ते अगदी उशीरा यावे यासाठी हे प्रयोग सुरू आहेत. त्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. जीवन अधिक काळ जगता यावे आणि दीर्घायुषी जगावे यासाठी हा प्रयोग सुरू आहे.

मृत्यूच्या पराभावासाठी कोट्यवधींचा चुराडा

जगातील सर्वात मोठे उद्योगपती आणि श्रीमंत हे वृद्धत्वाला, मृत्यूला हरवायला निघाले आहेत. ॲमेझॉनचे जेफ बेजोस, पेपलचे पीटर थील आणि OpenAI चे सॅम ऑल्टमॅन अशा प्रयोगावर आणि असे प्रयोग करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता गुंतवणूक करत आहेत. या कंपन्या मानवी शरीरातील सुक्ष्म पेशीवर काम करत आहेत. या पेशींमधील उतारवयाचा अंश काढून दीर्घकाळ जीवंत राहण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.

गुगलचे सर्गेई ब्रिन आणि फेसबुकचे शॉन पार्कर हे आता कॅन्सर आणि पार्किंसन सारख्या आजारांचे समूळ उच्चाटनासाठी पैसा करत आहेत. हे दोन्ही आजार मानवाला होऊच नये यासाठी संसोधन सुरू आहे. ब्रेनट्री आणि कर्नेल यासारख्या कंपन्या संस्थापक ब्रायन जॉनसन गेल्या काही वर्षांपासून वयाची वाढ थोपवण्यासाठी गेल्या काही वर्षात योग्य नियंत्रित आहार, खास व्यायाम, सप्लिमेंट्स, प्लाझ्मा बदल यासाठी कठोर श्रम घेत आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवीन वर्षात हे 4 रोपं बदलतील तुमचं नशीब, या दिशेने लावल्याने येईल समृद्धी
  • Horror Movies: थरकाप उडवणारे सिनेमे, यांच्यासमोर द कॉन्जुरिंगही फिका! नक्की पाहा
  • जम्मू काश्मीरमध्ये खळबळ! बडे नेते अचानक नजरकैदेत; काहीतरी मोठं घडण्याचे संकेत?
  • न्यू इअरसाठी अजून प्लॅन केला नाहीये? तर घरच्या घरीच अशा पद्धतीने करा सेलिब्रेट
  • बापरे बाप! सोन्याचा भाव 60 हजारांनी वाढला, एका तोळ्यासाठी द्यावे लागणार तब्बल…सर्वत्र खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in