
आंध्रप्रदेशाच्या पूर्वेला गोदावरी जिल्ह्यातील गोलाप्रोलू मंडल येथे मल्लावरम नावाचे गाव आहे. मल्लावरममध्ये सुब्रह्मण्येश्वर स्वामीचे मंदिर आहे. हे मंदिर निपुत्रिक महिलांसाठी वरदान आहे. येथे सर्पदोष निवारण आणि अपत्यप्राप्तीसाठी विशेष पूजा केली जाते. ज्या महिलांना मातृत्व हवे आहे त्यांना या मंदिरात थांबल्याने अपत्यप्राप्त होते असे श्रद्धा आहे.
या मंदिरात येणाऱ्या महिलांचे मानणे आहे की येथे झोपल्याने आपली पापे धुतली जातात आणि त्यांना अपत्य प्राप्त होते. अशी मान्यता गावात, जिल्ह्यात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. त्यामुळे या प्राचीन मंदिरात भक्तांचा प्रचंड गर्दीत असते. सुब्रह्मण्येश्वर स्वामींच्या षष्ठी सारख्या विशेष दिनाला निपुत्रिक पुरुष मोठ्या संख्येने मंदिरात येतात आणि विशेष पुजा करतात. पूजा करणारे पती-पत्नी एका वर्षानंतर झालेल्या मुलासह मंदिरात येतात आणि माथा टेकतात.
हे मंदिर सर्प दोष पूजेसाठी देखील प्रसिद्ध आहे. या मंदिरात येणाऱ्या निपुत्रिक स्रिया नागुला साडी परिधान करुन येतात आणि गर्भगृहाच्या पाठी शयन कक्षात एक तासांसाठी झोपतात. त्यानंतर दाम्पत्य मंदिरात आयोजित अभिषेकात सहभागी होतात आणि दोष पूजा करतात.
सुब्रह्मण्येश्वर स्वामी मंदिराचा महिमा
या ठिकाणी प्राचीन काळात चोल साम्राज्याचे शासन होते. शेतकऱ्याला एका शेतात ताम्रपत्र आणि ताडाच्या पानांवर लिहीलेला पांडुलिपितील काही शिलालेख सापडले होते. १९६० मध्ये एका शेतकऱ्याला शेतात तेथे शिलालेखाचे पत्र सापडले होते तेथेच एक मोठा साप दिसला होता. १९६२ मध्ये मल्लावरम गावातील काही बुजुर्गांनी जेथे साप रहात होता तेथे या मंदिराची पायाभरणी केली.
मंदिराच्या पुजाऱ्यानी सांगितले की पायाभरणी केल्यानंतर सापाने इश्वराच्या रुपात अवतार घेतला. काही काळानंतर येथे मोठा साप नियमित रुपाने मंदिरात येत होता. तेथील कोनेरुत स्नान करत होता. मंदिराचे भक्त त्याची पूजा करत असत.
ज्योतिषी चागंती कोटेश्वर राव यांनी अनेकदा या मंदिराचा दौरा केला आणि या मंदिराची वैशिष्ट्ये सांगितली. तेव्हापासून या मंदिरात येणाऱ्या भक्तांची सख्या जबरदस्त वाढली आहे. हे मंदिर भगवान सुब्रह्मण्येश्वर स्वामींची षष्ठी आणि शिवरात्रीच्या महिन्याची षष्ठी मंगळवारी एकाच वेळी येते त्यादिवसी हे मंदिर भक्तांनी भरते. या मंदिरात झोपण्यासाठी टोकन मिळावे यासाठी महिला रांगेत ताटकळत उभ्या असतात.
Leave a Reply