• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर सानिया मिर्झा हिने तो खुलासा केलाच, म्हणाली, आयुष्यातील त्या 8 ते 9 महिन्यात मी..

December 18, 2025 by admin Leave a Comment


सानिया मिर्झा कायम चर्चेत असणारे नाव आहे. सानियाने मोठा काळ टेनिसमध्ये गाजवला. भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आहे. अनेक इतिहास तिने रचले. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. त्यावेळी या लग्नाला जोरदार विरोधही झाला. सानिया आणि शोएब मलिक यांनी काही वर्ष डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सानिया मिर्झा हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी शोएब मलिक याचे लग्न झाले होते. लग्नानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक भारत किंवा पाकिस्तानमध्ये न राहता थेट दुबईला संसार थाटताना दिसले. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा एक मुलगा देखील आहे. सानिया कायमच आपल्या मुलासोबत खास वेळ घालवताना दिसते. अचानक शोएब मलिक याने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आणि एकच खळबळ उडाली.

सुरूवातीला चर्चा होत्या की, शोएब मलिक याने सानिया मिर्झा हिच्यासोबत घटस्फोट न घेता पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. मात्र, त्यानंतर सानियाच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले की, सानियाने शोएब मलिकसोबत खुला घेतला म्हणजेच घटस्फोट घेतला होता. शोएब मलिक याने थेट तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत खळबळ उडवली. शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतरही सानिया मिर्झा हिने दुबई सोडली नाही. सानिया मुलासोबतच दुबईत राहते.

घटस्फोटानंतर अनेक गोष्टींवर माैन बाळगताना सानिया मिर्झा दिसली. मात्र, आता ती घटस्फोटावेळी काय काय घडत होते हे सांगताना दिसतंय. ज्यावेळी ती एका वाईट काळातून जात होती आणि थरथर कापत होती त्यावेळी फराह खान हिने तिला सांभाळले होते आणि तिची काय अवस्था होती हे फराह खान हिला माहिती असल्याचे सानिया मिर्झा हिने सांगितले. हेच नाही तर दुसऱ्या प्रेग्नंसीसाठी आपण एग्स फ्रीज केले होते.

मसाबा गुप्तासोबतच्या पॉडकास्टमध्ये सानिया मिर्झाने हिने आता थेट तिच्या गर्भधारणेबद्दल मोठे भाष्य केले. सानिया मिर्झा हिने म्हटले की, मी माझ्या गर्भधारणेच्या त्या 8 ते 9 महिन्यांमध्ये इतक्या जास्त आणि अशा सर्व गोष्टी खाल्ल्या ज्या मी माझ्या आयुष्यातील 30 वर्षातही कधी खाल्ल्या नव्हत्या किंवा बघितल्या देखील नव्हत्या. गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना सानिया मिर्झा दिसत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashes 2025 : मिचेल स्टार्कला राग अनावर, लाईव्ह सामन्यात म्हणाला; बंद करून टाका सगळं…
  • Kia च्या कारवर 3.65 लाखांपर्यंत बंपर बेनिफिट्स, जाणून घ्या
  • प्रायव्हेट व्हिडीओने सोशल मीडिया हादरले… कोण आहे Payal Gaming ?
  • IND vs SA: पाचवा सामनाही धुक्यांमुळे रद्द होणार? अहमदाबादमध्ये कसं असेल हवामान?
  • फक्त दहावी पास आहात का? उत्तम पगार मिळवून देणाऱ्या या सरकारी नोकऱ्यांसाठी करा तयारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in