• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षरधाम येथे हिंदूधर्म ग्रंथातील प्रार्थनेवर संशोधनात्मक परिषद संपन्न, अनेक विद्वानांनी मांडले मौलिक विचार

December 14, 2025 by admin Leave a Comment


नवी दिल्ली – नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामिनारायण शोध संस्थेने (BAPS Swaminarayan Research Institute) रविवारी ‘हिंदू ग्रंथांमधील प्रार्थना: तात्विक, साहित्यिक आणि भक्तीपर परिमाणे’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. यात परिषदेला देशभरातील विद्यापीठे आणि संस्थेतील विद्वान, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांनी सनातन धर्मग्रंथांमधील प्रार्थनेचा सखोल अर्थ आणि त्यांचा मूळ दृष्टिकोन यावर संशोधन सादर केले.

उद्घाटन आणि प्रमुख भाषण

या परिषदेचा शुभारंभर पारंपारिक दीप प्रज्वलनासह प्रार्थना आणि वैदिक मंत्रांच्या उच्चारात करण्यात आले. यानंतर पूज्य डॉ ज्ञानानंददास स्वामी ( सहायक संचालक, बीएपीएस स्वामिनारायण संशोधन संस्था ) यांनी स्वागताचे भाषण केले. तसेच परिषदेच्या मुख्य विषयाची तात्विक आवश्यकता आणि महत्व स्पष्ट केले.

यावेळी प्रतिष्ठीत विद्वानात प्रो.मुरली मनोहर पाठक (कुलगुरू, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ),प्रा. शिव शंकर मिश्रा (कुलगुरू, महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठ, उज्जैन), प्रा. डी. बालगणपती (प्राध्यापक, तत्वज्ञान विभाग, दिल्ली विद्यापीठ), प्रा. उपेंद्र राव (प्राध्यापक, संस्कृत आणि भारतीय अभ्यास केंद्र, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ), प्रा. ओमनाथ बिमली (मुख्य अध्यक्ष, संस्कृत विभाग, दिल्ली विद्यापीठ), प्रा. गिरीश चंद्र पंत, विभागप्रमुख, संस्कृत, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली) यांचा समावेश होता. त्यांनी हिंदू परंपरेच प्रार्थनेचे महत्व या विषयावर आपले विचार मांडले.

BAPS स्वामीनारायण संशोधन संस्थेचे अध्यक्ष महामहोपाध्याय पूज्य भद्रेशदास स्वामी यांनी त्यांच्या व्हिडीओ संदेशात संमेलनाचा उद्देश्य विस्ताराने सांगितला. त्यांनी प्रार्थनेची आध्यात्मिक उन्नती, चरित्र निर्माण आणि मुक्ती प्राप्तीच्या साधनाच्या रुपात एक आवश्यक आणि शक्तीशाली माध्यम असल्याचे सांगितले.

मौलिक संशोधन सादरीकरण

परिषदेच्या दुसऱ्या आणि मुख्य सत्रात, विद्वानांनी विविध प्राचीन आणि मध्ययुगीन हिंदू ग्रंथांवर आधारित त्यांचे मूळ शोधनिबंध सादर केले.

या संशोधन पत्रांमध्ये प्रार्थनेच्या विविध आयामांचा समावेश होता, ज्यात वेदांमधील स्तुति, भक्ती साहित्यात समर्पण आणि अनन्य प्रेमभाव आणि प्रार्थनेचे मनोवैज्ञानिक परिणाम यांचा समावेश होता. प्रमुख प्रस्तुती सादर करणाऱ्या विद्वानात डॉ.नरेंद्रकुमार पंड्या (प्राचार्य, श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठ), श्रीमती शालिनी सारस्वत (संस्कृत शिक्षिका, मदर्स इंटरनॅशनल स्कूल), डॉ. माधवी यांचा समावेश होता.या सादरीकरणांमुळे विषयावरील अर्थपूर्ण आणि सखोल चर्चेचा मार्ग मोकळा झाला.

समारोप आणि आभार प्रदर्शन

परिषदेच्या समारोपाच्या वेळी, सर्व सहभागींना प्रमाणपत्रे भेट देण्यात आली. शेवटी, श्रीमती हिमानी मेहता यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्व विद्वानांचे, सहभागींचे आणि संस्थेच्या सदस्यांचे मनापासून आभार मानले.

बीएपीएस स्वामीनारायण संशोधन संस्थेबद्दल:

बीएपीएस स्वामीनारायण संशोधन संस्था ही नवी दिल्लीतील स्वामीनारायण मंदिर, अक्षरधाम येथे स्थित एक प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र आहे. ही संस्था भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, धर्मशास्त्र आणि भाषांचे संशोधन आणि अभ्यासासाठी समर्पित आहे, ज्याचा उद्देश प्राचीन ज्ञानाला आधुनिक संदर्भात सादर करणे आणि शैक्षणिक जग समृद्ध करणे हा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केशर हळदीच्या फेसमास्कमध्ये मिक्स करा ‘हे’ घटक, मुरूम होतील कमी
  • डॉ. राहुल गेठेंचे भामरागड ‘कनेक्शन’; प्रकाश आमटेंशी बोलताना नानांची भन्नाट ‘रिॲक्शन’
  • Sachin Tendulkar : ..आपण मुंबईत आहोत, सचिनची मेस्सीसमोर मराठीत ‘ओपनिंग’, क्रिकेटचा देव काय म्हणाला? पाहा व्हीडिओ
  • तुझ्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. सोनाक्षी सिन्हा हिची आरडाओरड ऐकून शेजारीही जमले, तरीही पती जहीर इक्बालने..
  • समुद्रात मिळाला हजारो वर्षांपूर्वीचा तो प्रचंड मोठा खजाना, पुरातत्व शास्त्रज्ञांना धक्का, धर्मग्रंथांमध्ये ही होता उल्लेख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in